येवला तालुक्याला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 10:01 PM2019-06-12T22:01:51+5:302019-06-12T22:04:04+5:30

येवला/जळगाव नेऊर : मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह सोसाट्याच्या वादळाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप शिवारातील जन्याबाई पोपट पाडेकर यांच्या घराचे पत्रे उडून धान्य, संसारोपयोगी साहित्य, मुलांचे शालेय पुस्तकांचे नुकसान झाले तसेच अर्जुन आनंदा जाधव यांच्या घराचे पत्रे, कांदा चाळ यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Storm of Yeola taluka | येवला तालुक्याला वादळाचा तडाखा

पिंपळगाव लेप शिवारात जन्याबाई पाडेकर यांच्या घरावरील उडालेले छप्पर, तर अर्जुन जाधव यांचे घराचे झालेले नुकसान.

googlenewsNext
ठळक मुद्देघरावरील पत्रे उडाले : पिंपळगाव लेप सजेत पंधरा लाखांचे नुकसान

येवला/जळगाव नेऊर : मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह सोसाट्याच्या वादळाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप शिवारातील जन्याबाई पोपट पाडेकर यांच्या घराचे पत्रे उडून धान्य, संसारोपयोगी साहित्य, मुलांचे शालेय पुस्तकांचे नुकसान झाले तसेच अर्जुन आनंदा जाधव यांच्या घराचे पत्रे, कांदा चाळ यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जऊळके शिवारातील दिनकर सूर्यभान शिंदे यांचे पत्र्याचे शेड उडून नुकसान झाले असून, वेणूबाई चव्हाण व रंगनाथ शिंदे यांच्या घरावरील पत्रे या वाºयाने उडून गेले आहेत. तसेच चांगदेव रामा जाधव यांच्या शेतातील दत्तमंदिरावर पन्नास वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाड पडल्याने मंदिर जमीनदोस्त झाले. पिंपळगाव लेप सजेत पंधरा लाखांच्या आसपास नुकसान झाले असून, तलाठी कमलेश पाटील यांनी घरोघरी जाऊन पंचनामा केला आहे. प्रचंड उन्हाच्या काहिलीत गेल्या तीन महिन्यांपासून भाजून निघाल्यामुळे प्रत्येक जण पावसाची वाट पाहत होता; पण पावसाबरोबर वादळी वाºयाने शेतकºयांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वादळामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीसाठी हा पाऊस चांगला असला तरी शेतकºयांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे.
येवला
जोरदार वादळासह अल्पपावसाचा अनुभव मंगळवारी सलग चौथ्या दिवशी येवलेकरांनी घेतला. या वादळामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. मंगळवारी अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून लाखो रुपयांचे नुकसान
झाले. तसेच खिर्डीसाठे येथे वीज
पडून शेळी व मेंढी जागीच ठार
झाली.
गेल्या तीन दिवसांप्रमाणे मंगळवारीही सुरु वातीला दहा ते पंधरा मिनिटे जोरदार वादळ झाल्याने ग्रामीण भागात विशेषत: पूर्वभागात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. या वादळी पावसामध्ये कोळम खुर्द येथील संतोष साहेबराव भांडे यांचे पत्रे उडाले. देवदरी, खरवंडी व रहाडी येथे वादळी वाºयामध्ये पत्रे तसेच घराचे खूप नुकसान झाले आहे. ममदापूर येथे जनार्दन गुडगे यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले, तर जिजाबाई लहू साबळे यांच्या घराची भिंत पडून त्या जखमी झाल्या. त्यांना उपचाराकरिता येवला येथे दाखल करण्यात आले आहे. श्रवण साबळे व भाऊसाहेब वैद्य यांचे घर पडले. येथील व खरवंडी येथे शाळेचे पत्रे उडून गेले तसेच दहेगाव, पाटोदा येथील सुधाकर आहेर यांच्या घराचेही पत्रे उडाले. खिर्डीसाठे येथे अर्जुन साबळे यांची मेंढी तसेच तुळशीराम पवार यांची शेळी वीज पडून ठार झाल्या.
पिंपळगाव लेपमध्ये जन्याबाई पाडेकर यांच्या घराचे पत्र्याचे छत वादळामुळे उडाले. त्यात घरगुती सामानाचे नुकसान झाले. तसेच जन्याबाई व त्यांचा मुलगा विजय जखमी झाला असून, डोक्याला व पायाला टाके पडले. जऊळके येथे जाधव वस्तीवर पिंपळाचे झाड कोसळून नुकसान झाले. ममदापूरला अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले असून, केरे वस्ती हनुमान मंदिर वरील पत्रे उडून गेले आहेत.येवल्याच्या २० टक्के भागात अंधारशनिवारी झालेल्या वादळी पावसाने शहरात विजेचे खांब पडून तारा तुटल्या आहेत. अनेक ठिकाणी खांबावर झाडे पडल्याने खांब वाकले आहेत. तसेच तारा तुटल्याने शहराच्या बहुतांशी भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज वितरणच्या कर्मचारी व अधिकाºयांनी दोन दिवस मेहनत घेऊन अनेक भागात पुरवठा सुरळीत केला असला तरी विंचूर रोड परिसरात काही भागात सलग तिसºया दिवशी अंधार आहे. अजूनही १५ ते २० टक्के भागात वीजपुरवठा खंडित होता. जऊळके येथे विजेचे खांब तसेच तारा तुटलेल्या असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत.वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे गावनिहाय पंचनामे सुरू आहेत. भिंत पडून मृत झालेल्या महिलेच्या नातेवाइकांना व वीज पडून बैलजोडी ठार झालेल्या महिलेला शासकीय मदत देण्यात आली आहे. प्रशासन नुकसानीचा आढावा घेण्यासह पंचनामा करण्यासाठी दक्ष आहे.
- रोहिदास वारु ळे, तहसीलदार, येवला

Web Title: Storm of Yeola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस