भूखंड विक्रीवरून सभा वादळी

By admin | Published: September 28, 2016 12:05 AM2016-09-28T00:05:01+5:302016-09-28T00:05:24+5:30

जिल्हा मजूर सहकारी संघ वार्षिक सभा : तोटा झाल्यास जबाबदारी संचालकांची

Stormy gathering from sale of plots | भूखंड विक्रीवरून सभा वादळी

भूखंड विक्रीवरून सभा वादळी

Next

नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संघाच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मागील संचालक मंडळाने खरेदी केलेल्या आडगाव येथील भूखंड विक्रीवरून सभेत वादळी चर्चा झाली. अखेर हा भूखंड विक्री करून तोटा झाल्यास तो भरून देण्याची जबाबदारी मागील संचालक मंडळाची राहील, अशी ग्वाही संचालक मंडळाला बैठकीत द्यावी लागली. सभेतील सर्व विषय वाचून आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली.
जिल्हा मजूर संघाची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष प्रमोद मुळाणे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष चिंतामण गावित संचालक संपतराव सकाळे, राजेंद्र
भोसले, शिवाजी रौंदळ, शशिकांत आव्हाड, मुन्ना हिरे, संभाजीराजे पवार, योगेश गोलाईत, नीलेश अहेर, शिवाजी कासव, जगन वाजे, विठ्ठलराव वाजे, शशिकांत उबाळे, योगेश गोलाईत, आशा संजय चव्हाण, प्रतिभा रमेश शिरसाठ, प्रमोद भाबड, सुरेश भोये, सचिव सुनील वारुंगसे आदि उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला विष्णुकांत गिते, राजेंद्र पाटील, प्रकाश म्हस्के, ज्ञानेश्वर कदम यांनी मागील संचालक मंडळाने घेतलेल्या आडगाव येथील भूखंड खरेदीचा मुद्दा उपस्थित केला.
राजेंद्र भोसले यांनी सभासदांच्या या मुद्द्यावरील सर्व प्रश्नांना आपण सविस्तर उत्तरे देऊ, मागील वेळीही हा भूखंड विक्री करून तोटा आल्यास तो संचालक मंडळ भरून देणार असल्याच्या मुद्द्यावर संचालक ठाम असल्याचे भोसले यांनी सांगितले.
मात्र तरीही सभासदांचे समाधान न झाल्याने संपतराव सकाळे यांनी संचालक मंडळाची याप्रकरणी चूक झाली, हे कबूल केले. मात्र संचालक मंडळ तोटा आल्यास भरून देण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकशी सुरू असल्यानेच याप्रकरणी पुढे कार्यवाही होत नसल्याचे सकाळे यांनी सांगितले. अध्यक्ष प्रमोद मुळाणे यांनी सभासदांच्या बोनस संदर्भातील मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल, अशी ग्वाही दिली. संजय बडवर यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सभेस सभासद माजी संचालक संजय चव्हाण, अरुण गायकर, भय्या सांगळे, एम. एस. सांगळे, कृष्णा पारखे, अशोक वाजे, पंकज जाधव, मनोज कुमावत आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महापालिकेच्या विरोधात याचिका
शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नाशिक महानगरपालिकेने मजूर सहकारी संस्थांना कामे देणे अपेक्षित असल्याचे सभासदांनी सांगितले. मात्र महापालिका कामे देत नसल्याचा आरोप केला. त्यावर संचालक योगेश हिरे यांनी महापालिकेने तीन लाखांच्या आतील कामे मजूर संस्थांना द्यावीत, यासाठी आपण स्वत: महापालिका आयुक्तांना भेटलो आहोत. तसेच महापालिकेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे सांगितले.
२५ हजार बोनस द्या
सभेत सकाळे यांनी मजूर संघाची परिस्थिती चांगली असल्याचे सांगितले. तोच धागा पकडून यंदा सभासदांना दिवाळीत २५ हजार बोनस द्यावा, असा ठराव ज्ञानेश्वर कदम यांनी मांडला तो संमत करण्यात आला. मात्र समाधान होईल, असा बोनस दिला जाईल, अशी ग्वाही संचालक संपतराव सकाळे यांनी दिली.
 

Web Title: Stormy gathering from sale of plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.