वादळी पावसाने पोल्ट्रीचे शेड कोसळले

By admin | Published: June 21, 2017 12:28 AM2017-06-21T00:28:25+5:302017-06-21T00:28:38+5:30

वादळी पावसाने पोल्ट्रीचे शेड कोसळले

Stormy rain poultry sheds collapsed | वादळी पावसाने पोल्ट्रीचे शेड कोसळले

वादळी पावसाने पोल्ट्रीचे शेड कोसळले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
झोडगे : मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसरात दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसात शेंदुर्णी येथे गणेश शिंदे यांचे शेतातील पोल्ट्री फार्मचे दोन शेड कोसळून पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. या दोन्ही शेडमध्ये एकूण साडेआठ हजार पक्षी होते. या वादळामुळे शिंदे यांचे जवळपास १२ ते १३ लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. वादळामुळे शेड पूर्णपणे कोसळून पाया खचला आहे. शेडमधील लाईट, पाण्याची भांडी फुटली. त्यामुळे गणेश शिंदे यांचे मोेठे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचा शासनामार्फत महसूल विभागाने पंचनामा करावा व नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.

Web Title: Stormy rain poultry sheds collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.