नांदूरवैद्य येथे काल्याच्या किर्तनाने अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 05:48 PM2018-12-24T17:48:03+5:302018-12-24T17:48:19+5:30
नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या नांदूरवैद्य येथील भैरवनाथ मंदिर येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही गीता जयंती तथा दत्त जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील थोर संत महंत व नामवंत किर्तनकारांच्या प्रमुख उपस्थितीत ४३ वा अखंड हरिनाम सप्ताह पार पडला.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परिसरातुन अनेक नामवंत गायक, वादक, प्रबोधनकार व परिसरातील अनेक भाविकांनी या सप्ताहास हजेरी लावली. यावेळी नामवंत किर्तनकार शिवचरित्रकार राम महाराज गणेशकर, जयंत महाराज गोसावी, विठ्ठल महाराज टोचे, श्रावण महाराज जगताप, सागर महाराज दिंडे, माधव महाराज घुले, महामंडालेश्वर, डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर, आदी किर्तनकारांनी सातही दिवस या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये वेगवेगळ्या विषयावर ज्ञानप्रबोधन केले. त्यानंतर गावातुन माऊलींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. जोहाराच्या कार्यक्र मानंतर दहिहंडीने कार्यक्र माची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी मनोहर महाराज सायखेडे, प्रभाकर महाराज मुसळे, राजाराम महाराज मुसळे, नामदेव महाराज डोळस, शिवाजी महाराज मुसळे, दत्तात्रेय महाराज दिवटे, सोपान महाराज मुसळे, संतोष महाराज डोळस, अतुल महाराज तांबे, सखाहारी काजळे, तसेच महिला भजनी मंडळ उपस्थित होते.
(फोटो २४ नांदूरवैद्य)
नांदूरवैद्य येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काल्याच्या सांगता किर्तनाप्रसंगी प्रबोधन करतांना निलेश महाराज पवार.