कुस्त्यांच्या दंगलीने देवगाव यात्रेची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 06:25 PM2018-12-27T18:25:10+5:302018-12-27T18:25:37+5:30

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही जगदंबा माता यात्रा महोत्सव उत्साहात करण्यात आला. गाजलेल्या मल्लांच्या कुस्तीने यात्रेची सांगता करण्यात आली. सोमवार व मंगळवारी वजनी गटात कुस्त्यांची दंगल झाली.

The story of Devgn Yatra by the wretched mob | कुस्त्यांच्या दंगलीने देवगाव यात्रेची सांगता

देवगाव येथील कुस्त्यांच्या दंगलीत बाजी मारलेल्या मल्लाला बक्षीस देताना सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, भाऊसाहेब बोचरे, प्रकाश जोशी, तुकाराम बोचरे, श्यामराव लोहारकर आदी.

Next
ठळक मुद्देजगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

देवगाव : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही जगदंबा माता यात्रा महोत्सव उत्साहात करण्यात आला. गाजलेल्या मल्लांच्या कुस्तीने यात्रेची सांगता करण्यात आली. सोमवार व मंगळवारी वजनी गटात कुस्त्यांची दंगल झाली. महाराष्ट्रातील औरंगाबाद, तुळजापूर, शिरु र, अहमदनगर, चाळीसगाव, नाशिक, येवला, मनमाड, उस्मानाबाद येथील मल्लांच्या सहभागाने चित्तथरारक फड रंगला, बांगडी, स्वारी, धोबीपछाड, कालीजंग, टांग असे एकसे बढकर एक डावपेच मल्लांनी दाखवत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. मोठे पहिलवान मैदानात उतरताच कुस्त्या अधिक रंगल्या होत्या. चार दिवस चाललेल्या महोत्सवात मातेच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दत्त जयंतीच्या दिवशी सायंकाळी गावातील मुख्य रस्त्यांवरून ढोल ताशांच्या गजरात जगदंबा मातेच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
यात्रेनिमित्त जिल्ह्यातील भाविकांसह नोकरी, शिक्षण, व्यवसाय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्थानिक झालेले देवगावकर मोठ्या भक्तिभावात जगदंबा मातेच्या दर्शनासाठी यात्रेसाठी आले होते. भाविकांनी केलेले नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. विजयी झालेल्या मल्ल्यांना येवला पंचायत समितीचे उपसभापती रु पचंद भागवत, विजय अढांगळे, नयना निकाळे, बापू मल्हारी, अरविंद बडवर, पं.स. सदस्य गयाबाई सुपनर, अनिल लोहारकर, उपसरपंच विनोद जोशी, संजय अढांगळे, संदीप डुकरे, किरण अढांगळे, नारायण आव्हाड आदी मान्यवरांनी बक्षिसासाठी रक्कम दिली.
पं.स. सदस्य भाऊसाहेब बोचरे, राजाराम मेमाणे, निवृत्ती बोचरे, दत्तात्रय बोचरे, जयेश लोहारकर, उत्तम मेमाणे, गोपीनाथ मेमाणे, अश्पाक शेख, तुकाराम बोचरे, विनायक बोचरे, नामदेव बोचरे, विश्वनाथ निलख, संपत अढांगळे, रवींद्र बोचरे, संतोष बोचरे, राजेंद्र मेमाणे, मनोहर बोचरे, योगेश बोचरे, रवींद्र साबळे, भागवत बोचरे, लहानू मेमाणे, उमर काद्री, जावेद शेख, वैभव जोशी, दगू बोचरे, परसराम बोचरे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. लासलगाव पोलीस सहायक निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसपाटील सुनील बोचरे, देवगाव बीट हवालदार डी.के. ठोंबरे, एम.एम. उबरे, कोळपे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
 

Web Title: The story of Devgn Yatra by the wretched mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.