येवल्यातील उपोषणाची सांगता
By admin | Published: March 3, 2017 01:18 AM2017-03-03T01:18:34+5:302017-03-03T01:18:48+5:30
येवला: पाणीवापर सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केलेले उपोषण सहायक अभियंता व्ही. एस. भागवत यांनी पुढील पाच दिवसांसाठी पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.
येवला: पालखेड पाटबंधारे विभागाच्या डावा कालवा वितरिका क्रमांक ३६ वरील पाणी वापर सहकारी संस्थांना त्यांच्या हक्काचे ४० टक्के पाणी मिळावे यासाठी पाणीवापर सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून येथील पालखेड कार्यालयासमोर सुरु केलेले आमरण उपोषण बुधवारी रोजी सहायक अभियंता व्ही. एस. भागवत यांनी पुढील पाच दिवसांसाठी पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. या प्रकरणी शिवसेनानेते संभाजीराजे पवार, मविप्र चे संचालक अंबादास बनकर, भाजपाचे शहर अध्यक्ष
आनंद शिंदे, तालुका अध्यक्ष
राजूसिंग परदेशी यांनी शिष्टाई केली.
शेतकऱ्यांच्या भावना पाहुन येथील अंबादास बनकर,
पंचायत समीतीचे माजी सभापती संभाजीराजे पवार, आनंद शिंदे, तालुकाध्यक्ष राजूसिंग परदेशी,
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांचे स्वीय सहायक बी. आर. लोंढे, कोमल वर्दे, अंगणगावचे सरपंच विठ्ठलराव आठशेरे, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती अरुण काळे, पारेगावचे माजी सरपंच
रवि काळे यांनी मध्यस्थी करून अधिकारी व उपोषणकर्ते
यांच्यात समन्वय साधला. शेतकऱ्यांच्या भावना अधिकाऱ्यांना सांगून पाच दिवसांसाठी वितरिका
क्रमांक ३६ ला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन देण्यास भाग पाडले.
बुधवारी दुपारी ३ वाजेपासून पालखेड अधिकारी उपोषणकर्त्यांची समजूत घालत होते. मात्र शेतकरी व संस्थांचे पदाधिकारी ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
पालखेड पाटबंधारे कार्यालयासमोर भाऊसाहेब कांबरे, शामराव मढवई, ज्ञानेश्वर मढवई, प्रमोद लभडे, चंद्रकांत मोरे, किसन मढवई, दिगंबर आव्हाड, दिगंबर गायकवाड, अंगणगावचे सरपंच विठ्ठलराव आठशेरे, जनार्दन खिल्लारे, सुर्यकांत दिवटे, अण्णा कोटकर, बद्री मढवई आदिंसह पाणीवार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरु केले होते. यावेळी पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभिंयता राजेश गोवर्धने, उपविभागीय अभियंता आर. के. दिंडे, शाखा अभियंता जी. आर. काकुळते उपस्थित होते. (वार्ताहर)