कथा गोडसेंची..जोड
By Admin | Published: May 17, 2014 11:52 PM2014-05-17T23:52:20+5:302014-05-18T00:34:17+5:30
इन्फो
...पण निष्ठेचे काय?
राजाराम गोडसे हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. गोडसे यांनी सेनेत असताना जिल्हाप्रमुखापासून खासदारकीपर्यंतचा प्रवास अनुभवला. मात्र, पक्षातून अडगळीत पडल्याची भावना होऊन राजाराम गोडसे यांनी सेनेला रामराम ठोकत मनसेत प्रवेश केला होता. हेमंत गोडसे यांनाही मनसेत आणण्यात त्यांचा मोठा वाटा सांगितला जातो. हेमंत गोडसे यांनी सुरुवातीला मनसेकडून निवडणूक लढविली; परंतु नंतर पुन्हा उमेदवारी मिळणार नाही, ही शक्यता गृहित धरून मनसेला रामराम ठोकत सेनेत प्रवेश केला. सेनेने गोडसेंवर विश्वास टाकत पुन्हा उमेदवारी बहाल केली. नशिबाने गोडसेंना साथ दिली आणि गोडसेंनी दिल्ली सर केली. राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी दोघा गोडसेंना मात्र निष्ठेला तिलांजली द्यावी लागली. अर्थात राजकारणात निष्ठेची व्याख्या सोईनुसार बदलत असते.