‘सुनंदिनी’त कथा, कवितांचे वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:15 AM2018-08-23T00:15:32+5:302018-08-23T00:20:36+5:30

स्वाती किशोर पाचपांडे यांच्या लेखणीतून अवतरलेली किमया व विद्या करंजीकर यांची संकल्पना असलेला सुनंदिनी हा सुश्राव्य अभिवाचन कार्यक्रम सप्तस्वभावातील सात महिलांनी सादर केला.

 Story of 'Sunandini', reading of poems | ‘सुनंदिनी’त कथा, कवितांचे वाचन

‘सुनंदिनी’त कथा, कवितांचे वाचन

googlenewsNext

गंगापूररोड : स्वाती किशोर पाचपांडे यांच्या लेखणीतून अवतरलेली किमया व विद्या करंजीकर यांची संकल्पना असलेला सुनंदिनी हा सुश्राव्य अभिवाचन कार्यक्रम सप्तस्वभावातील सात महिलांनी सादर केला. निमित्त होते पुस्तकपेठेच्या वतीने विविध क्षेत्रांतल्या स्त्रियांच्या कथा, कवितांच्या वाचनाचे.
डिसूझा कॉलनीतील प्रौढ नागरिक मित्रमंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पुष्पात ‘ऋण फिटता फिटेना, शब्दात ही मावेना’ या प्रांजली बिरारी - नेवासकर यांच्या सुमधुर गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘आठवणी जुळल्या त्या माहेरच्या’ या श्रिया जोशी यांच्या ‘मायेचा वटवृक्ष’ या कथेचे वाचन करण्यात आले. पावसाळ्यात सिग्नलवरच्या कारमध्ये दिसलेला ‘तो’ या पल्लवी पटवर्धन यांची कथा, शुभांगी पाठक यांच्या ह्य तू तिथे मी ह्य या कथांचे वाचन कण्यात आले. आधुनिक स्त्रीच्या भूमिकेत असताना व्यावहारिक आयुष्यातले तिचे आणि त्याचे जुळलेले ऋणानुबंध आणि त्यातून येणाºया दुराव्याचा भाव ‘तू असा जवळी रहा’ असे म्हणत विद्या करंजीकर यांनी व्यक्त केला. ‘जगणे प्रवाही होणे’ ही हेमा जोशी यांची कथा व ‘आला श्रावण श्रावण, सखा मनभावन’ आदी कविता सख्यांनी यावेळी सादर केल्या.

Web Title:  Story of 'Sunandini', reading of poems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक