काळाराम मंदिरात आजपासून कथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:20 PM2020-02-25T23:20:06+5:302020-02-26T00:12:14+5:30
श्री काळाराम मंदिरात बुधवार (दि.२६) पासून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम गुट्टे यांच्या संगीतमय गणेश महापुराण कथा तसेच राज्यातील महिला कीर्तनकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचा सप्ताह म्हणून उत्तर महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नाशिक : श्री काळाराम मंदिरात बुधवार (दि.२६) पासून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम गुट्टे यांच्या संगीतमय गणेश महापुराण कथा तसेच राज्यातील महिला कीर्तनकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचा सप्ताह म्हणून उत्तर महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सीतामाई महिला वारकरी ट्रस्ट, जय अंबे चॅॅरिटेबल ट्रस्ट, संत सद्गुरू चंपामाई महाराज यांच्या संयुक्त विद्यमाने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महंत राधाताई सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमात सकाळी मोफत प्राणायाम व योगविज्ञान, सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी संगीतमय गणेश महापुराण कथा ज्ञानयज्ञ, तसेच सायंकाळी सामुदायिक हरिपाठ, हरिकीर्तन होईल.
सप्ताहात ज्ञानेश्वरी क्षीरसागर, रेखा काकड, रेखा हांडगे, गीता हगवणे, वैशाली काळे, शारदा सूर्यवंशी यांची कीर्तने होतील. मंगळवारी (दि. ३ मार्च) श्री गणेश महापुराण कथेचा तर सप्ताहाचा समारोप बुधवारी महंत राधाताई सानप यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सीतामाई महिला वारकरी ट्रस्ट अध्यक्ष विश्वनाथ घुगे, मनोहर लाटे, शंकर बारकुल, भरत सांगळे, तुकाराम नागरे, आदींनी केले आहे.