गाळणे किल्ला संवर्धन प्रकल्प आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:27 AM2021-03-13T04:27:32+5:302021-03-13T04:27:32+5:30
मालेगाव : तालुक्यातील गाळणे गाव व गाळणे किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा ...
मालेगाव : तालुक्यातील गाळणे गाव व गाळणे किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
बैठकीत वृक्षलागवड व संवर्धन, किल्ला पर्यटन, वनौषधी वृक्षलागवड, फळबाग लागवड, पुरवणी आराखडा तयार करणे, तसेच एमआरइजीएसअंतर्गत कामाची सुरुवात करणे, सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे गाळणे येथे संपर्क केंद्र स्थापन करणे, संपूर्ण गावाचा विकास आराखडा तयार करणे आदी विषयांबाबत चर्चा झाली. गाळणे किल्ला ही ऐतिहासिक वास्तू तालुक्याची संस्कृती आहे. तिचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले. बैठकीस जितूभाई कुटमुटिया, सभापती भटू जाधव, वन विभाग, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण व पंचायत समितीचे अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.