सर्वेक्षणासाठी जाणाऱ्याआशासेविकेवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 02:33 PM2020-08-10T14:33:32+5:302020-08-10T14:37:03+5:30
खामखेडा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणासाठी जात असलेल्या खामखेडा येथील आशासेविकेवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढवल्याने त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामखेडा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणासाठी जात असलेल्या खामखेडा येथील आशासेविकेवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढवल्याने त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली आहे.
देवळा तालुक्यातील खामखेडा येथे आढळून आलेल्या कोरोनाबाधीत रु ग्णांच्या घराजवळील परिसरात राहणाºया नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच सर्वेक्षणासाठी जात असलेल्या आशासेविका मनीषा समाधान वाघ यांच्यावर अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढवला. यातून त्यांनी स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली, परंतु पिसाळलेल्या कुत्र्याने हाताचे लचके तोडल्याने त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्यांना खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून आरोग्यसेविका लता ठाकरे यांनी स्वत: अधिक उपचारासाठी कळवण उपजिल्हा रु ग्णालयात त्यांना दाखल केले. यावेळी तपासणी करून रेबीज प्रतिबंधक लस देऊन त्यांना घरी सोडून देण्यात आले.
शासेविका आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्याला-खांदा लावून काम करताहेत. कोरोना संसर्गाशी सुरू असलेल्या युद्धात ग्रामीण भागात अगदी गल्लीबोळात आणि वाड्या-वस्त्यांवर आशासेविका स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अत्यल्प मानधनावर काम करतआहेत, परंतु त्यांना अशा एक ना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.