भटकी कुत्र,े मोकाट जनावरांचा उपद्रव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:39 PM2019-12-14T18:39:38+5:302019-12-14T18:41:13+5:30
खेडलेझुंगे : शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा त्रास शेतकऱ्यांना होत असल्याचे दिसुन येत आहे. या मोकाट कुत्र्यामुळे शेतपीकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकरी शेतमाल वाचविण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना नेहमीच करत असतो. त्याचप्रमाणे सद्या महागडे झालेल्या कांद्याच्या रोपांचे कुत्र्यापासुन नुकसान होवु नये यासाठी मिनरल वॉटरच्या रीकाम्या बाटल्यांमध्ये लाल रंगाचे पाणी करुन ते शेतात टेवण्यात येत आहे. लाल रंगामुळे कुत्री त्याजवळ येत नाहीत असा समज आहे.

आधीच परतीच्या पावसामुळे शेत मालांचे मोठ्या प्रमाणावर ़नुकसान झालेले असल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. आधी लष्करी अळी, अवकाळी पाऊसामुळे शेतकर्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेले आहे. पावसामुळे इतर पिकांसोबतच कांद्याचे रोपांचे अतोनात नुकसान झालेले आहे. जास्तीचा दराने कांद्याचे उळे खरेदी करु न पुन्हा जोमाने कांद्याचे रोप तयार करण्यात येत आहे. परंतु आस्मानी-सुलतानी संकटानंतर मोकाट जनावरे, भटकी कुत्र्यापासुन शेत पीक वाचिवणे अत्यंत जिकरीचे होवुन बसलेले आहे. त्यामुळे शेतकरी श्रध्दा-अंधश्रध्देचा विचार न करता लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या शेतात ठेवत आहेत.
कुंकू आण िपाण्याच्या मिश्रणाच्या नामी शक्कलमागे अंधश्रद्धा किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन नसला तरी लाल भडक रंगाच्या पाण्याच्या बाटल्या पाहून कुत्रे दचकतात. नवीन काहीतरी दिसतेय म्हणून कुत्रे त्याजवळ फिरकत नाही यातूनच मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला वैतागलेल्या नागरीकांना दिलासा मिळाल्याचे दिसून आले. अर्थात कालांतराने या लालरंगाच्या पाण्याच्या बाटल्यांमधील कलर उन्हामुळे कमी होतो तसेच या बाटल्यांची सवय पडल्यानंतर कुत्र्यांचा वावर परत सुरू होतो, असाही एक मतप्रवाह आहे. त्यामुळेच शहरांसह ग्रामीण भागात देखील दारापुढे, शेतांमध्ये लाल रंगाच्या बाटल्या दिसत आहेत.
चौकट.... लाल रंग आणि कुत्रा
लाल रंगाच्या बाटल्यांजवळ कुत्रे फिरकत नसल्याने शेतकर्यांनी शेतात हा प्रयोग राबविण्यास सुरवात केलेली आहे. यामुळे सर्वत्र लाल रंगाचे पाणी भरलेल्या बाटल्या दारात, परसात, गोठ्याच्या दारात ठेवण्याचा उपाय श्रध्दा-अंधश्रध्देतुन सर्वत्र पोहोचला आहे.
लाल रंगाच्या पाण्याला कुत्रे घाबरते, हा शोध किंवा निष्कर्ष कोणी काढला, याची कोणालाही माहिती नाही. त्यामागे काही दैवी चमत्कार नाही. हा लाल रंगाच्या पाण्याचा प्रयोग सर्वत्र सुरू आहे. आणि कुत्र्याचा उपद्रव कमी झाला असा लोकांचा अनुभव आहे.