मालेगावी भरदिवसा पथदीप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:33 AM2021-01-13T04:33:20+5:302021-01-13T04:33:20+5:30

----- कोरोना लस मोफत देण्याची मागणी मालेगाव : शहरात यंत्रमाग मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, रोजंदारीवर काम करणाऱ्यांची संख्या ...

Street lights on all day in Malegaon | मालेगावी भरदिवसा पथदीप सुरू

मालेगावी भरदिवसा पथदीप सुरू

Next

-----

कोरोना लस मोफत देण्याची मागणी

मालेगाव : शहरात यंत्रमाग मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, रोजंदारीवर काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामुळे राज्य शासनाने कोरोना लसीकरण मोहीम राबविताना शहरातील नागरिकांना मोफत लस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे.

-----

रावळगाव शुगर फार्मवर कारवाई करा

मालेगाव : रावळगाव साखर कारखान्याच्या मालकांनी कामगारांचे देणे न देता साखर कारखान्याची विक्री केली आहे. ना हरकत दाखला नसेल तर कारखान्याची विक्री करता येत नाही. हरकत प्रमाणपत्राची चौकशी नाशिकच्या कामगार उपायुक्तांनी करून रावळगाव शुगर फार्मवर कारवाई करावी, अशी मागणी राज्य साखर कामगार महासंघाचे नेते देवराज गरूड यांनी पत्रकान्वये केली आहे.

-----

ग्रामपंचायत मतदान सीलिंग प्रक्रिया पूर्ण

मालेगाव : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या ३१७ प्रभागांतून एकूण ७०८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांचे नाव, चिन्ह, मतदानयंत्राची सीलिंग प्रक्रिया रविवारी रात्री उशिरा झाली. याबाबत निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही झाले. आता दुसऱ्या टप्प्यात उर्वरित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

-----

चंदनपुरी यात्रा रद्द झाल्याने भाविकांत नाराजी

मालेगाव : कोरोनाच्या दहशतीमुळे प्रशासनाने चंदनपुरी यात्रा रद्द केली असून यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा खंडित झाली असून साध्या पद्धतीने भाविक दर्शन घेऊन जात आहेत. यात्रेसाठी चंदनपुरीत राज्यभरातून दरवर्षी लाखो भाविक हजेरी लावतात.

----

माळमाथा भागात आरोग्य तपासणी करा

मालेगाव : तालुक्यातील माळमाथा भागातील गरीब व गरजू रुग्णांची तत्काळ आरोग्य तपासणी करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार चंद्रजित राजपूत यांना सादर करण्यात आले. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात कोविड केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यामुळे इतर आजारांची रुग्णालयात तपासणी बंद आहे. तपासणीसाठी ग्रामीण भागातील जनतेला इतरत्र भटकंती करावी लागते. यामुळे ग्रामीण भागात नॉनकोविड केंद्र सुरू करावे.

-----

गिरणा पुलाखाली आढळला मृतदेह

मालेगाव : सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास गिरणा नदी पुलाखाली मृतदेह आढळून आला. शरीफ मन्सुरी यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह सामान्य रुग्णालयात दाखल केला. किल्ला पोलीस ठाण्याचे कर्मचारी नागोरे यांनी व्हॉट‌्सॲपवर फोटो अपलोड केल्यानंतर मृताची ओळख पटली. बशीर खान रशीद खान (७०, रा. पवारवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बशीर खान हे सकाळी साडेनऊ वाजता नास्ता करून घरातून निघाले होते. गिरणा पुलाची चाळी तुटली असून, पुलावरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला.

----

सामान्य रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डे

मालेगाव : शहरातील सामान्य रुग्णालयाकडे जाणाऱ्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून, संबंधितांनी पुलावरील खड्डे बुजवून पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे सामान्य रूग्णालयात नेण्यात येते. खड्ड्यांमुळे रुग्णासह रुग्णवाहिकेतील नातलगांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

----

शेरूळ विद्यालयात जिजाऊंना अभिवादन

मालेगाव : तालुक्यातील शेरूळ येथील केबीएच विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एन. के. मिसर होते. त्यांनी प्रतिमापूजन केले. वाय. एस. ठोके, एस. जे. बच्छाव, के. जी. बागुल यांची भाषणे झाली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन बी. एस. वानखेडे यांनी केले. एस. बी. शेवाळे यांनी आभार मानले.

फोटो फाईल नेम : १२ एमजेएएन ०१ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील शेरूळ येथील केबीएच विद्यालयात प्रतिमापूजनप्रसंगी मुख्याध्यापक एन. के. मिसर, बी. एस. वानखेडे, वाय. एस. ठोके आदी.

-----

सौंदाणे जनता विद्यालयात जिजाऊंना अभिवादन

मालेगाव : तालुक्यातील सौंदाणे येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी एम. पी. पवार होत्या. श्रीमती पवार, प्राचार्य वाय. आर. पवार, उपप्राचार्य के. डी. दाभाडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यार्थिनी प्रांजल आहेर, शिक्षक टी. वाय. पगार, व्ही. एस. हाके, श्रीमती पवार यांची भाषणे झाली. प्राचार्य पवार व उपप्राचार्य दाभाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन व्ही. एस. हाके यांनी केले.

फोटो फाईल नेम : १२ एमजेएएन ०२ . जेपीजी

फोटो कॅप्शन : सौंदाणे येथील जनता विद्यालयात प्रतिमापूजनप्रसंगी एम. पी. पवार, प्राचार्य वाय. आर. पवार, उपप्राचार्य के. डी. दाभाडे, टी. वाय. पगार, व्ही. एस. हाके आदी.

===Photopath===

120121\12nsk_1_12012021_13.jpg~120121\12nsk_2_12012021_13.jpg

===Caption===

फोटो फाईल नेम : १२ एमजेएएन ०१ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील शेरूळ येथील के. बी. एच. विद्यालयात प्रतिमा पूजनप्रसंगी मुख्याध्यापक एन. के. मिसर, बी. एस. वानखेडे, वाय. एस. ठोके आदि.फोटो फाईल नेम : १२ एमजेएएन ०२ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथील जनता विद्यालयात प्रतिमा पूजन प्रसंगी श्रीमती एम. पी. पवार, प्राचार्य वाय. आर. पवार, उपप्राचार्य के. डी. दाभाडे, टी. वाय. पगार, व्ही. एस. हाके आदि.~फोटो फाईल नेम : १२ एमजेएएन ०१ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील शेरूळ येथील के. बी. एच. विद्यालयात प्रतिमा पूजनप्रसंगी मुख्याध्यापक एन. के. मिसर, बी. एस. वानखेडे, वाय. एस. ठोके आदि.फोटो फाईल नेम : १२ एमजेएएन ०२ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथील जनता विद्यालयात प्रतिमा पूजन प्रसंगी श्रीमती एम. पी. पवार, प्राचार्य वाय. आर. पवार, उपप्राचार्य के. डी. दाभाडे, टी. वाय. पगार, व्ही. एस. हाके आदि.

Web Title: Street lights on all day in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.