शोरूमचा माल विक्रीसाठी रस्त्यावर
By admin | Published: August 5, 2016 01:22 AM2016-08-05T01:22:28+5:302016-08-05T01:23:57+5:30
सेलचा ‘पूर’: हजार रूपयांची साडी २०० रूपयांत
नाशिक : पुराचे पाणी दुकानांमध्ये शिरल्यामुळे ओला झालेला माल विक्रीसाठी रस्त्यावर मांडण्यात आला आहे. शालिमार, दहीपूल आणि पंचवटी कारंजा या भागात शोरूममधील ओला झालेला माल रस्त्यावर विकला जात आहे तोही अगदी स्वस्तात. हजार रुपयांची साडी २०० रुपये आणि लहान मुलांचे कपडे शंभर रुपयांत तीन आणि पन्नास, शंभर रुपयात बॅगा, काचेची भांडी, स्टीलची भांडी विकली जात आहे.
गोदावरी नदीला आलेल्या पुरात दहीपूल, सरदार चौक, मुठे गल्ली, नारोशंकर मंदिर मागील मार्केट, भांडीबाजार, या मागात पाणी शिरल्याने येथील दुकानांमधील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दहीपुलावर साड्या आणि ड्रेस मटेरियल, मॅचिंग सेंटरची दुकाने असल्याने सर्वाधिक नुकसाच या दुकानदारांचे झाले आहे. बरेचसे कपडे वाहून गेले तर उरलेला माल ओला झाल्याने अगदी स्वत:त हा माल विकला जात आहे. साड्या खरेदीसाठी, तर महिलांची झुंबड उडाली आहे. शालिमार येथील रस्त्यावरदेखील दुकानात नुकसानग्रस्त झालेला माल विक्रीसाठी आणला गेला आहे.