मालेगावच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 08:43 PM2020-06-10T20:43:37+5:302020-06-11T00:59:28+5:30
मालेगाव कॅम्प : मालेगावी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरभरात अनेक रस्ते विविध प्रकारे बंद केले होते. मात्र आता अनलॉकमुळे सर्व नियमावली बदलली असल्याने बंधनात ठेवणाऱ्या लोखंडी जाळीसह इतर अडथळे काढल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, रहदारी सुरू झाली असली तरी ही परिस्थिती चिंतेत भर टाकत आहे.

शहरात एप्रिल महिन्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर रुग्ण वाढत गेले. मे महिन्यात रुग्णसंख्या सातशेवर गेली. त्यामुळे या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी आपले संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले. यात सोशल डिस्टन्सिंगसह इतर उपाययोजना केल्या. संसर्ग होऊ नये यासाठी आपल्या परिसरात रस्ते निमर्नुष्य केले. यासाठी कॉलनी, वसाहती, नगरे, काही मुख्य रस्ते रहिवाशांनी लोखंडी जाळ्या, बांबू, बल्ली, काटे, झाडे-झुडपे लावून बंद केले होते.
गेल्या दोन महिन्यापासून येथील रहदारीला ब्रेक लावला होता. शहरात पाचव्या लॉकडाऊनच्या टप्प्यावर शहर अनलॉक करण्याचा निर्णय झाला. पूर्वीचे नियम रद्द करण्यात आले. शहरात अंशत: व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात
आली. त्यामुळे रस्ते खुले करण्यात आले.
शहरातील पूर्व भागासह पश्चिम भागातील संगमेश्वर, कॅम्प रस्ता, सटाणा रोड, जुना, नवा आग्रा रोड, शहरातील नदीवरील पाच सहा
पूल रहदारीसाठी जाळीमुक्त केले
गेले. यामुळे शहरातील अर्थकारणास व दळणवळणास चालना
मिळाली आहे. सायंकाळी ५ नंतर व्यवसाय बंद होतात. रस्ते मात्र खुले असतात.
----------------------------
मालेगावी अद्याप हॉटेल, बार, सलून दुकाने यासह काही व्यवसाय बंद आहेत. त्या बाबतीत निर्णय येणे बाकी आहे. मात्र शहर पुन्हा हळूहळू रूळावर येत आहे. गेल्या दोन महिन्याच्या लोखंडी जाळी व इतर बंधनातून रस्ते सुटले असल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असल्याचे चित्र दिसत आहे.