टोळीयुध्द रोखण्यासाठी पोलिसांना बळ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 10:33 PM2020-10-03T22:33:44+5:302020-10-04T01:08:05+5:30
नाशिकरोड : उपनगर पोलिस ठाण्याकरिता नवीन जागा देऊन स्वतंत्र इमारत उभारण्यात यावी तसेच नाशिकरोड, जेलरोडसह आदी भागात वाढणारे टोळीयुद्ध थांबविण्यासाठी पोलिसांना बळ द्यावे, कारण परिमंडळ-2मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी अधिकाधिक फोफावत असून आता नवे सहायक आयुक्त देखील लाभले आहे, यामुळे नजीकच्या काळात गुन्हेगारीला अटकाव करावा, अशी मागणी नागरिकांनी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडे जनता दरबारात केली.
नाशिकरोड : उपनगर पोलिस ठाण्याकरिता नवीन जागा देऊन स्वतंत्र इमारत उभारण्यात यावी तसेच नाशिकरोड, जेलरोडसह आदी भागात वाढणारे टोळीयुद्ध थांबविण्यासाठी पोलिसांना बळ द्यावे, कारण परिमंडळ-2मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी अधिकाधिक फोफावत असून आता नवे सहायक आयुक्त देखील लाभले आहे, यामुळे नजीकच्या काळात गुन्हेगारीला अटकाव करावा, अशी मागणी नागरिकांनी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडे जनता दरबारात केली.
नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रत्येक पोलिस ठाण्यात जनता दरबार भरविण्याचे दिपक पाण्डेय यांनी जाहिर केले होते. शनिवारी (दि.3) सकाळी उपनगर पोलिस ठाण्यात पोलीस अधिकारी, कमर्चारी यांच्या समस्या, अडचणी तक्रारी ऐकून घेतल्यात. उपनगर पोलिस ठाण्याची हद्द समस्या जाणून घेत सर्वांशी चर्चा केली. तसेच उपनगर पोलीस ठाण्यात दुपारी लोकप्रतिनिधी शांतता समिती सदस्य नागरिक यांच्या झालेल्या जनता दरबारामध्ये उपनगर पोलिस ठाण्याला स्वतंत्र नवीन जागा मिळाली असून पोलिस ठाण्याची इमारत त्वरित उभी करावी, पोलिसबळ वाढवावे, बेकायदेशीर दारु विक्री, अवैध धंदे रोखावे अशी सूचना नगरसेवक राहुल दिवे यांनी केली. उद्यान व समाज मंदिरामध्ये मद्यपींच्या रंगणा?्या पार्टी, टवाळखोर यांच्यावर कारवाई करावी. तसेच गँगवार, चेनस्नॅचिंगचे प्रकार रोखण्यासाठी पोलिस बळ वाढविण्याची सूचना नगरसेवक प्रशांत दिवे यांनी केली. माजी नगरसेविका सुनंदा मोरे यांनी अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली. शालेय मुलांना अंमलीपदार्थांचे व्यसन लावणा-यांवर कारवाई करावी, समाजमंदिरातील टवाळखोरी, गैरप्रकार थांबवावेत, बालगुन्हेगारी रोखावी, गुंडांना तडीपार करावे, पोलिस खब-यांची संख्या वाढवावी आदी मागण्या जनता दरबारामध्ये करण्यात आल्या. आल्या.
पोलिसांना पांडेय यांनी दिली तंबी
पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सकाळी पोलीस अधिकारी व कमर्चारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेत प्रत्येकाने सोबत लाठी, शिट्टी, पेन, डायरी ठेवली पाहिजे. परवानगी न घेता मोर्चा, आंदोलन करणा?र्यांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच उल्लेखनीय काम करणा?्या अधिकारी व कमर्चा?्यांना दैनंदिन रिवार्ड देण्यात येऊन त्याची नोंद घेतली जाईल असे पांडे यांनी स्पष्ट केले.
गुंडगिरी मोडून काढणार; पोलीस ठाण्यांच्या कारभार सुधारणार
जनता दरबारामध्ये बोलताना पोलीस आयुक्त दीपक पांडे म्हणाले की, रस्त्यावर वाढदिवसाचा केक कापून हैदोस घालणा-यांवर थेट लाठीमार करणार असल्याचे स्पष्ट केले. मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, दुकांनापुढे गर्दी करणे, रस्त्यावर थुंकणे याबाबत शहरात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात गँगवार, टवाळखोर, गुंडगिरी करणा-यांवर कठोर कारवाई केली जाईल. बाल गुन्हेगारी, उद्यान, समाज मंदिरामध्ये दारूच्या पार्ट्या, गुंडगिरी, चेन स्नॅचिंग, अवैध धंदे आदींबाबत तातडीने उपाययोजना केली जाईल. जसा आजार तसे औषध असेल. प्रत्येक शनिवारी आपण एका पोलिस ठाण्याला भेट देऊ असे पांडे यांनी स्पष्ट केले.