शिक्षणामुळे मिळते गरुडभरारी घेण्याचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:45 AM2018-03-20T00:45:51+5:302018-03-20T00:45:51+5:30
भारताच्या गौरवशाली इतिहासात शिक्षणाद्वारे बिकट परिस्थितूनही यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची अनेक उदाहरणे समोर ठेवून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेण्याची गरज असून, शिक्षणामुळे जीवन जगताना विविध क्षेत्रांत गरुडभरारी घेण्याचे बळ मिळत असल्याचे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी केले आहे.
नाशिक : भारताच्या गौरवशाली इतिहासात शिक्षणाद्वारे बिकट परिस्थितूनही यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची अनेक उदाहरणे समोर ठेवून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेण्याची गरज असून, शिक्षणामुळे जीवन जगताना विविध क्षेत्रांत गरुडभरारी घेण्याचे बळ मिळत असल्याचे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी केले आहे. अशोकस्तंभ परिसरातील आधाराश्रमाच्या ६४व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बर्वे बोलत होते. व्यासपीठावर निशा पाटील, सुनीता परांजपे, अर्चना बर्वे, संस्थेचे अध्यक्ष विजय दातार आदी उपस्थित होते. यावेळी देविका अंबारकर, आरती खारे, मोनिका लोहकरे, श्रावणी चिचे, काजल अग्रवाल, व्ही. भवानी या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. तसेच गोपिका वाघ, शालिनी बोडके, रेखा तुरे, सीता मोरे, नीता जाधव या कर्मचाºयांसह संस्थेच्या देणगीदारांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रभाकर केळकर यांनी केले. सूत्रसंचालन निशा पाटील यांनी केली आहे. शुभांजली पाडेकर यांनी आभार मानले. डॉ. राजेंद्र बर्वे म्हणाले, शिक्षणाच्या जोरावर व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकते. त्यासाठी प्रामाणिकपणे अभ्यास करण्याची गरज व्यक्त करतानाच विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.