दोन समाजामध्ये किरकोळ कारणावरून झालेला तणाव भद्रकालीत पोलिसांची दंगल नियंत्रणाची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:21 AM2017-12-30T00:21:03+5:302017-12-30T00:21:44+5:30
दोन समाजामध्ये किरकोळ कारणावरून झालेला तणाव, गौसियाची मिरवणूक आणि त्यानंतर लागलीच येणाºया ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्र वारी (दि.२९) पोलिसांनी रुटमार्च केला.
नाशिक : दोन समाजामध्ये किरकोळ कारणावरून झालेला तणाव, गौसियाची मिरवणूक आणि त्यानंतर लागलीच येणाºया ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्र वारी (दि.२९) पोलिसांनी रुटमार्च केला. दंगा नियंत्रण कार्यवाहीची रंगीत तालीम करताना पोलिसांनी यावेळी दुचाकीवाहनांचा वापर केला.
नाशिक शहरातील अतिशय संवेदनशील समजल्या जाणाºया भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत वाद मिटवल्या येथील तणावाचा प्रसंग टळला. परंतु, या घटनेनंतर तत्काळ या भागातून गौसीयाची मिरवणूक आणि त्यापाठोपाठ येणाºया ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलिसांनी खबरदारी घेत शुक्रवारी रुटमार्च केला. यावेळी पोलिसांचा मोठा ताफा दुचाकीवरून संवेदनशील भागात फिरला. तसेच दंगा नियंत्रण पथकाची यावेळी रंगीत तालीमही घेण्यात आली.