ताण-तणावामुळे तरुणांना बसतोय हृदयरोगाचा ‘झटका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:09 AM2019-09-30T00:09:44+5:302019-09-30T00:10:21+5:30
काळानुरूप सर्वच क्षेत्रात वाढती स्पर्धा अन् त्यामधून निर्माण होणारा ताणतणाव तरुणाईला विविध व्यसनांकडे घेऊन जात आहे. परिणामी तरुणाई व्यसनाधीन होऊन निकृष्ट आहाराला पसंती देऊ लागली आहे. त्याचा थेट परिणाम तरुण हृदयावरही होऊ लागल्याचे मत शहरातील हृदयरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले.
नाशिक : काळानुरूप सर्वच क्षेत्रात वाढती स्पर्धा अन् त्यामधून निर्माण होणारा ताणतणाव तरुणाईला विविध व्यसनांकडे घेऊन जात आहे. परिणामी तरुणाई व्यसनाधीन होऊन निकृष्ट आहाराला पसंती देऊ लागली आहे. त्याचा थेट परिणाम तरुण हृदयावरही होऊ लागल्याचे मत शहरातील हृदयरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले.
बदलती जीवनशैली, कामाचा तणाव तसेच विविध व्यसनांमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराची समस्या वाढीस लागत आहे. वाढत्या वयासोबत रक्तात चरबीचे प्रमाण वाढून रक्त गोठणे ही बाब नैसर्गिक आहे. मानसिक ताणतणाव, बैठी जीवनशैली व निष्कृष्ट आहारशैलीमुळे तरुणाईच्या रक्तात ‘कोलेस्ट्रॉल’ वाढत असून, ऐन तारुण्यात हृदयाला धक्का बसत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविली आहे. हृदयरोग म्हटला की पूर्वी वयाची साठी असलेली व्यक्ती डोळ्यापुढे येत होती, मात्र मागील दहा वर्षांमध्ये ही परिस्थिती बदलली असून, या जीवघेण्या आजाराचा वयोगट झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. हृदयरोगावर तज्ज्ञांनीही याबाबत आश्चर्य व्यक्तकेले आहे. वयाच्या विशी-तिशीमध्येच हृदयविकाराचा झटका नागरिकांना येत असल्याचे चित्र शहरासह जिल्ह्यातही पहावयास मिळत आहे. तरुण पिढीतील वाढती स्पर्धा, लालसा आणि असमाधानी वृत्तीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसते, यामुळे ताणतणावाचा सामना क रावा लागतो, परिणामी व्यसनाधीनता, निकृष्ट आहाराला प्राधान्य अशा सवयी तरुणाईला जडल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या सवयींचा दुष्परिणाम थेट त्यांच्या हृदयालाच बंद करण्यापर्यंत जाऊन पोहचला असून, ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे.
व्यसन व ताणतणावच हृदयविकारास कारणीभूत
हृदयविकाराचा आजार हा सद्यस्थितीत ज्येष्ठांमध्ये नसून तरुणांमध्येच याचे वाढते प्रमाण दिसून आल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असून, यासाठी विविध प्रकारचे व्यसन व कामाचा ताणतणाव या कारणांमुळेच या आजाराला तरुण बळी पडत आहे. व्यसनांमध्ये तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू इत्यादी व्यसनांमुळे हृदयविकार बळावत आहे. तसेच असमाधानी जीवनामुळे जास्त प्रमाणात ताणतणाव निर्माण होतो. त्यामुळे याचा परिणाम थेट हृदयावरच होत असल्यामुळे या आजाराचे प्रमाण सध्याच्या जीवनात वाढत आहे.
तारुण्यात हृदयविकाराचा झटका येणे यासाठी आपली बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, व्यसन यामुळे हा आजार तरुणांना बळावत आहे. यामुळे तरुणांनी तणावमुक्त जीवन जगावे तसेच पुरेशी झोप, व्यायाम, उत्तम दर्जाचे अन्न घेतल्यास या आजारापासून सुटका मिळवू शकतो.
-डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, हृदयरोगविकार तज्ज्ञ
कामाच्या ताण तणावामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येतो.तरुणांमध्ये वाढते व्यसन यामुळेही या आजाराला आमंत्रण मिळते. -डॉ. मनोज चोपडा,
हृदयरोगविकार तज्ज्ञ
आता ३० ते ४० वयोगटांतील तरुणांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याचे काही वर्षांत दिसून येत आहे. फास्ट लाइफ, व्यसने, व्यायामाचा अभाव या क ारणांमुळेच हा आजार तरुणांमध्ये जडत आहे.
-डॉ. राहुल कैचे,
हृदयरोगविकार तज्ज्ञ