तणावमुक्त, आरोग्यदायी राहा, हाच हृदय दिनाचा संदेश डॉ. सुरेश सुर्यवंशी यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:43 PM2019-09-28T23:43:26+5:302019-09-28T23:46:23+5:30
नाशिक- हदय विकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तरूणांमध्ये देखील हा विकार वाढू लागला आहे. बदलती जीवन शैली आणि वाढते ताण तणाव यामुळे यंदा सुदृढ राहा आणि इतरांसाठी प्रेरणादायी बना असे ब्रीद देण्यात आले आहे. हृदय रोग टाळून सुदृढ राहणे हे त्या व्यक्तीच्याच नव्हे तर कुटूंबाच्या दृष्टीने महत्वाचे आहे, असे मत नाशिक येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश सूर्र्यवंशी यांनी रविवारी (दि.२९) होत असलेल्या जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले.

प्रश्न: हृदय दिनाचे यंदा वेगळे ब्रीद आहे. त्याविषयी काय सांगाल?
डॉ. सूर्यवंशी: होय. दरवर्षी साजरा होणाऱ्या हृदय दिनाच्या दिवशी वेगवेगळे ब्रीद असते. यंदा वर्ल्ड हार्ट फाऊंडेशनने प्रतिबंधात्मक उपायासाठी सदृढ राहा आणि इतरांसाठी प्रेरणादायी बना असे ब्रिद दिले आहे. हृदय विकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी असे विकार टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मानसिक तणाव घालवणे आणि स्वस्थ सुदृढ राहील्यास तो कुटूंबाच्या दृष्टीने आदर्श ठरू शकतो. आपण आपल्या कुटूंबासाठीच नव्हे तर कार्यालयातील अन्य सहकारी, समाजासाठी देखील प्रेरणादायी ठरू शकतो. त्यातूनच जनजागृती होऊ शकतो.
प्रश्न: हृदय विकार टाळण्यासाठी कोणत्या स्वरूपाची दक्षता घेतली पाहिजे.
डॉ. सूर्यवंशी: हृदय विकार टाळण्यासाठी सर्व प्रथम बदलत्या जीवन शैलीत बदल केला पाहिजे. त्याच बरोबर सिगारेट, तंबाखुजन्य पदार्थ आणि मद्यपान टाळले पाहिजे. मुख्य म्हणजे चालणे आणि ध्यानधारणा केली पाहिजे. चार ते पाच किलो मीटर चालणे आणि अर्धातास प्राणायम, सुदर्शन क्रिया अशाप्रकाची ध्यान धारणा केली पाहिजे. बºयाच नोकरी व्यवसायात रात्री उशिरा घरी जाणे आणि सकाळी उशिरा उठणे यामुळे व्यायाम होत नाही अशी सबब सांगितली जाते. तथापि, चोवीस तासात केवळ एक तास माणसाने स्वत:च्या आरोग्यासाठी दिल्यास तो सुदृढ राहू शकतो. आणि इतक्या साध्या व्यायामासाठी खर्चाची देखील आवश्यकता नाही.
प्रश्न: तरूणाईत हृदय विकाराचे प्रमाण वाढत आहे, त्या विषयी काय सांगाल?
डॉ. सूर्यवंशी: तरूणांना नोकरी व्यवसायानिमित्त धावपळ करावी लागते. या जीवन शैलीत ताण तणाव वाढतो आणि त्यामुळे विकार वाढतात. त्याच मद्यपान, सिगारेट आणि तंबाखुजन्य पदार्थांचा वापर देखील कमी वयातच सुरू होतो. त्यामुळे व्यसने टाळली पाहिजेत या पथ्याबरोबरच ताण तणावाचे व्यस्थापन केले पाहिजे. तर हा विकार टाळता येईल.
मुलाखत- संजय पाठक