सटाणा तहसीलवर दीड तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 11:42 PM2017-08-10T23:42:30+5:302017-08-11T00:16:35+5:30

अपंग कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी व आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शहर व तालुक्यातील अंध, अपंग, निराधार व ज्येष्ठ नागरिकांनी आज गुरु वारी (दि. १०) दुपारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून हल्लाबोल केला. अधिकाºयांकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आम्ही निघणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे तहसील कार्यालयाच्या गेटवर तब्बल दीड तास ठिय्या आंदोलन सुरु होते. दरम्यान, प्रांत प्रवीण महाजन यांनी आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

Stretch one and a half hours on Satana tahsil | सटाणा तहसीलवर दीड तास ठिय्या

सटाणा तहसीलवर दीड तास ठिय्या

Next

सटाणा : अपंग कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी व आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शहर व तालुक्यातील अंध, अपंग, निराधार व ज्येष्ठ नागरिकांनी आज गुरु वारी (दि. १०) दुपारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून हल्लाबोल केला. अधिकाºयांकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आम्ही निघणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे तहसील कार्यालयाच्या गेटवर तब्बल दीड तास ठिय्या आंदोलन सुरु होते. दरम्यान, प्रांत प्रवीण महाजन यांनी आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
बागलाणचे प्रांत प्रवीण महाजन यांनी तत्काळ दखल घेत सहायक गटविकास अधिकारी महेंद्र कोर, पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे, नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण व संजय गांधी निराधार योजनेच्या अधिकाºयांना तत्काळ पाचारण करून तहसीलदारांच्या दालनात बैठक घेतली. ज्येष्ठ नागरिक व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना गेल्या अनेक महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे उपासमारीची वेळ आल्याचे निदर्शनास आणून दिले. प्रांत महाजन यांनी येत्या २० आॅगस्टपर्यंत लाभार्थींच्या खात्यावर वेतन जमा करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. घरकुलांसाठी आता आॅनलाइन प्रक्रि या सुरू असून, संबंधित विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधावा. काही अडचणी आल्यास लेखी तक्रार करण्याचे आवाहन महाजन यांनी केले. पालिका कार्यक्षेत्रात येणाºया अंध, अपंग, निराधार व ज्येष्ठ नागरिकांसाठी बजेटच्या तीन टक्के खर्च करणे अपेक्षित आहे. त्याचा लाभ मिळत नसल्याच्या तक्र ारी आहेत. याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही महाजन यांनी दिल्या. मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात अशोक अहिरे, शेखर परदेशी, राजू जगताप, नाना कुमावत, शांतीलाल भाटिया, राम जाधव, गोविंद ठाकरे, साहेबराव बिरारी, सुनंदा महाले, वंदना साबळे, मीना बोरसे यांच्यासह महिला, पुरु ष सहभागी झाले होते.
 

 

Web Title: Stretch one and a half hours on Satana tahsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.