कचरा डेपोतील कुबट धुराने ओझरकर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:45 PM2020-02-14T12:45:30+5:302020-02-14T12:46:15+5:30
ओझर : येथील कचरा डेपोतील ढीग रात्रीच्यावेळी जाळण्याच्या प्रयोगात हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. धुराचे लोळ सगळ्या गावात जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने अनेकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यात सर्वच प्रकारचा कचरा येथे एकत्र केला जात असल्याने यो धूर अत्यंत विषारी ठरत आहे.
ओझर : येथील कचरा डेपोतील ढीग रात्रीच्यावेळी जाळण्याच्या प्रयोगात हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. धुराचे लोळ सगळ्या गावात जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने अनेकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यात सर्वच प्रकारचा कचरा येथे एकत्र केला जात असल्याने यो धूर अत्यंत विषारी ठरत आहे. त्यामुळे अनेकांना गंभीर आजार जडण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या ओझर येथे सर्वाधिक चर्चेचा मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे कचरा जाळण्यामुळे होणाऱ्या त्रासाचा. येथे जुन्या सायखेडा रोड जवळील अनुसया पार्कला लागून असलेल्या कचरा डेपोच्या दुर्गंधीने अनेक जण हैराण झाले आहे. त्यामुळे परिसरात आजारपण वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.ओझर येथे बाणगंगा नदी किनारी मारु ती वेस स्मशानभूमी मागे व जुन्या सायखेडा रोडला लागून कचरा डेपो असून गावातील तसेच उपनगरातील सर्व कचरा हा घंटागाडीने तेथे आणून टाकला जातो.परंतु गावचा वाढता विस्तार व दररोज हजारो किलो जमा होत असलेला ओला व सुका कचरा हा सदर ठिकाणी आणून टाकला जात असताना त्याची विल्हेवाट रात्री जाळून लावण्यात येत असल्याने तो नागरिकांच्या जीवावर उठत आहे. ओला सुका कचरा एक होत असल्याने जागेची प्रचंड कमतरता होत आहे. कचरा डेपोला लागूनच वसाहत आहे तर नदी पलीकडे शेती व शेलार,शिंदे,कदम वस्ती आहे. या आधीही जेसीबीच्या सहाय्याने डम्पिंग करत असताना त्याची दुर्गंधी नागरिकांना सहन करावी लागली होती. सध्या सायंकाळनंतर दररोज कचरा जाळण्याचे प्रमाण वाढल्याने पसरत असलेल्या धुराचे लोळ दुर्गंधी मुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महत्वाची बाब म्हणजे सार्वजनिक शौचालाय सदर ठिकाणी असल्याने कुबट वासाचा सामना लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांना देखील करावा लागत आहे. सदर प्रकरण गंभीर असताना सुद्धा प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी का खेळत आहे असा सवाल सामान्य नागरिकांनी व्यक्त केला आहे.