दिंडोरीत पोलिसांकडून कडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:13 AM2021-04-18T04:13:33+5:302021-04-18T04:13:33+5:30
दिंडोरी : कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव व जिल्हाधिकारी, नाशिक यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत ...
दिंडोरी : कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव व जिल्हाधिकारी, नाशिक यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवीन नियमावली म्हणजेच गाईडलाईन्स जारी केली आहे.
या अनुषंगाने दिंडोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात नियमित कारवाई केली जात आहे. त्यात सरकारी वाहनातून दिंडोरी नगर पंचायत हद्दीत व दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील हॉटस्पॉट ठरलेली गावे मोहाडी, जानोरी, मडकीजांब, उमराळे या गावांमध्ये जात अनाऊन्सिंग करून लोकांमध्ये जनजागृती तसेच जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात येत आहे. विनाकारण फिरताना सापडणे, संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन करणे, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा सुरू ठेवणे, तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे अशा वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलीस हवालदार गायकवाड, वाघेरे, दांडेकर, पोलीस शिपाई महेश कुमावत, चालक पठाण, होमगार्ड अपसुंदे, भरसठ हे कारवाई करत आहेत. तोंडाला मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून १,४०० रुपये दंड वसूल केला आहे.