जायखेड्यात कडक संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:46 PM2020-04-10T23:46:35+5:302020-04-10T23:47:32+5:30
जायखेडा : मागील चार दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रु ग्णांचा आकडा वेगाने वाढू लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यातच मालेगाव येथे कोरोनाने एकाचा मृत्यू झाल्याने मालेगावपासून जवळ असलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन व आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
जायखेडा : मागील चार दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रु ग्णांचा आकडा वेगाने वाढू लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यातच मालेगाव येथे कोरोनाने एकाचा मृत्यू झाल्याने मालेगावपासून जवळ असलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन व आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जायखेडा अधिक सतर्कझाले असून, ग्रामपंचायतीने प्रवेशद्वार व गावात येणारे इतर सर्व मार्ग बंद केले आहेत. गावात कुठलेही बाहेरील वाहन किंवा व्यक्तीने प्रवेश करू नये याबाबत खबरदारी घेत सरपंच शांताराम अहिरे, उपसरपंच संदेश मोरे, ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी हरी शेवाळे, मसुद पठाण, सचिन ब्राह्मणकार, सुरेश पवार, पोपट जगताप, सागर सोलंकी, विजय अहिरे, विनोद वाघ, सचिन दोडवे, सुदाम बोरसे, मगन मोरे, शंकर सोनवणे, अजय सोलंकी कडक पहारा देत आहेत. गर्दी टाळण्यासाठी पुन्हा एकदा गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.