बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 01:05 AM2019-12-07T01:05:39+5:302019-12-07T01:06:58+5:30
दहा वर्षीय बालिकेला बिस्कीट घेण्याच्या बहाण्याने घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रकाश चक्रपाणी चुडामणी (रा. पिंपळगाव बसवंत) यास निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. दिग्रसकर यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
लासलगाव : दहा वर्षीय बालिकेला बिस्कीट घेण्याच्या बहाण्याने घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रकाश चक्रपाणी चुडामणी (रा. पिंपळगाव बसवंत) यास निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. दिग्रसकर यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात १५ नोव्हेंबर २०१५ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रकाश चक्रपाणी चुडामणी हा रात्री ९ वाजता घरी येऊन दहा वर्षीय मुलीस बिस्किट घेऊन देतो, असे सांगून घेऊन गेला. बराच वेळ होऊनही तो मुलीला घेऊन परत आला नाही, म्हणून पती-पत्नी बघण्यास गेले असता लोक त्यास नग्नावस्थेत मारहाण करीत असल्याचे दिसले तर अल्पवयीन मुलगी रडत होती. त्यावेळी मुलीने वडिलांना प्रकाश चुडामणी याने केलेल्या अत्याचाराबाबत सांगितले. यावरून प्रकाश चुडामणीविरु द्ध पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६(२)(आय), बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४, ५ (एम), ८ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र रघुनाथ पाटील यांनी करून निफाड जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
सात साक्षीदारांची तपासणी
सरकार पक्षातर्फेसहायक जिल्हा सरकारी वकील अॅड. रमेश कापसे यांनी पीडित मुलीसह सात साक्षीदार तपासले. पैरवी अधिकारी कॉन्स्टेबल वेलजाळी यांनी सहकार्य केले. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश पी.डी. दिग्रसकर यांनी प्रकाश चंद्रमणी चुडामणी यास दोषी ठरवत दहा वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी सहा महिने सक्तमजुरी करावी लागणार आहे.