सिन्नर शहरात कडकडीत लॉकडाऊन सुुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 09:26 PM2020-07-22T21:26:10+5:302020-07-23T00:59:38+5:30

सिन्नर : शहर व तालुक्यात बुधवारी ११ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यात सिन्नर शहरातील चार, बारागावपिंप्री येथील चार, मानोरी येथील दोन तर सुळेवाडी येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.

Strict lockdown begins in Sinnar city | सिन्नर शहरात कडकडीत लॉकडाऊन सुुरू

सिन्नर शहरात कडकडीत लॉकडाऊन सुुरू

googlenewsNext

सिन्नर : शहर व तालुक्यात बुधवारी ११ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यात सिन्नर शहरातील चार, बारागावपिंप्री येथील चार, मानोरी येथील दोन तर सुळेवाडी येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.
तालुक्यात या ११ रुग्णांची भर पडल्यानंतर तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या ४१३ झाली आहे. आतापर्यंत सिन्नर ग्रामीण रुग्णालय व इंडिया बुल्स येथील कोविड रुग्णालयातून ३०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या १०१ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून, २१ रुग्णांचे अहवाल येण्याची प्रतीक्षा असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तालुक्यात रुग्णसंख्या चारशे पार झाल्यानंतर प्रशासन व व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन १४ दिवस सिन्नर शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची आज, बुधवारपासून अंमलबजावणी सुरू झाली. शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
दवाखाने व औषध दुकाने सुरू होती. सिन्नर शहरात १४ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन केल्यानंतर शहरातील रस्ते निर्जन झाले होते. तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, सहाय्यक निरीक्षक राजेंद्र रसेडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्यासह पोलीस कर्मचारी व नगर परिषद कर्मचारी शहरातील रस्त्यांवर उतरले होते. शहराच्या तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्याने सिन्नर शहराच्या आत येणाºया प्रमुख चार रस्त्यांवर चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. सर्व प्रवाशांची सखोल माहिती घेतली जात होती.
-----------------
मेडिकल सकाळी १० ते ४ उघडे राहणार
सिन्नर शहरातील मेडिकल असोसिएशनने सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मेडिकल उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला असून, शहरातील सर्व दवाखाने हे २४ तास सेवा पुरवत आहेत. दवाखान्यातील मेडिकल सेवादेखील चोवीस तास उपलब्ध आहे. तसेच मेडिकल असोसिएशनने आपत्कालीन वेळेत मेडिकल सेवा दिली जाईल, असेही जाहीर केले आहे.
१२ हजार ५०० रुपये दंड वसूल
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रस्त्यावर विनामास्क फिरताना आढळून आलेल्या नागरिकांकडून प्रतिव्यक्ती २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दुचाकीवर डबल सिट, चारचाकी गाडीमध्ये तीनपेक्षा जास्त प्रवासी आढळून आल्यास अशांनाही दंड आकारण्यात आला आहे. अशा प्रकारची कार्यवाही करत जवळपास १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.

Web Title: Strict lockdown begins in Sinnar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक