रुग्ण आढळणाºया ठिकाणी आता कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 07:38 PM2020-07-10T19:38:46+5:302020-07-10T19:39:45+5:30

शहरात जास्तीत जास्त रुग्णसंख्या आढळून येत असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेता यापुढे ज्या भागात अधिक रुग्ण आढळतील अशा ठिकाणी कठोर लॉकडाऊन करण्यात येणार आहे. शहरातील अनेक भागात एकाचवेळी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक अंमलबजावणीचा पर्याय समोर आला आहे.

Strict lockdown now at the place where the patient is found | रुग्ण आढळणाºया ठिकाणी आता कडक लॉकडाऊन

रुग्ण आढळणाºया ठिकाणी आता कडक लॉकडाऊन

Next

नाशिक : शहरात जास्तीत जास्त रुग्णसंख्या आढळून येत असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेता यापुढे ज्या भागात अधिक रुग्ण आढळतील अशा ठिकाणी कठोर लॉकडाऊन करण्यात येणार आहे. शहरातील अनेक भागात एकाचवेळी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक अंमलबजावणीचा पर्याय समोर आला आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्र वारी (दि.१०) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरोना नियंत्रणबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते.
शहरात आढळणाऱ्या रुग्णसंख्येचा विचार करता यापुढे अधिकाधिक रुग्ण खाटांची आवश्यकता लागणार असल्याने त्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. चर्चेत मेडिकल कॉलेज ३५०, एसएमबीटी कॉलेज १५० बेड उपलब्ध होऊ शकतात. येणार सर्व खर्च शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आॅक्सिजन टँकची आवश्यकता असलेल्या ठिकाणी तशी व्यवस्था केली जाणार आहे. कोविड सेंटरमध्ये अधिकाधिक सक्षम सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, शासकीय आस्थापनांच्या रुग्णालयाच्या खाटांवरदेखील चर्चा झाल्याचे कळते.
शासनाकडून कोरोनाची औषधे व इतर खर्चासाठी सहा कोटी रु पयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शासनाकडून येणाºया नवीन औषधांचा वापर शासकीय रु ग्णालयात प्राधान्याने करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जिल्हा रु ग्णालयात टेस्टिंग लॅब सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले असून, लवकरात लवकर शासनाची लॅब सुरू करण्यासाठीचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती बैठकीत पालकमंत्र्यांनी दिली. जास्तीत जास्त टेस्टिंग करून अधिकाधिक रु ग्णांचा शोध घेऊन उपचार करण्यात येत आहे.
---इन्फो---
मृत्युदारात नाशिक १२व्या क्र मांकावर
शहरात आढळणाºया रुग्णांबरोबरच रुग्ण दगावण्याच्यादेखील घटना घडत आहेत. मृत्युदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्टÑाच्या तुलनेत नाशिकमधील मृत्युदर कमी असून, अन्य शहरांच्या तुलनेत आपला क्र मांक १२वा आहे, तर रिकव्हरी दर पाचव्या क्र मांकावर आहे. असे असले तरी मृत्युदर आणखी कमी होण्यासाठीचे यंत्रणा प्रयत्न करीत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले

Web Title: Strict lockdown now at the place where the patient is found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.