देवळा तालुक्यात आता कडक निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 10:14 PM2021-03-31T22:14:22+5:302021-04-01T00:53:07+5:30
लोहोणेर : कोरोना रुग्णांची संख्या देवळा तालुक्यात झपाट्याने वाढत असून या महामारीला आळा घालणे गरजेचे असून कंटेन्मेंट झोनमध्ये समाविष्ट असलेल्या गावांतील नागरिकांनी या बाबत अत्यंत सर्तक होणे आवश्यक आहे. या रोगाने बांधीत असलेले काही रुग्ण काळजी न घेता बिनधास्तपणे सर्वत्र फिरतांना आढळून येत असून नागरिकही विना मास्क फिरत आहेत. त्यामुळे शासन नियम न पाळणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश देवळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी बुधवारी (दि.३१) लोहोणेर येथे घेतलेल्या बैठकीत दिले.

नागरिकांच्या या निष्काळजी पणामुळे तालुक्यातील रुग्ण संख्येत वाढ होत असून याबाबत स्थानिक पातळीवर कोरोना केअर सेंटर निर्माण करून कोरोनाचा फैलाव करणाऱ्यांना कॉरंटाईन करण्यात यावे या बाबत योग्य प्रतिसाद न मिळाल्यास तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.
देवळा तालुक्यातील बहुतांश गावांत दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. याला कुठेतरी आळा घालण्यासाठी डॉ. मांडगे यांनी लोहोणेर जिल्हा परिषद गटातील खांमखेडा, सावकी, विठेवाडी, लोहोणेर, खालप, वासोळ या गावात जाऊन ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा व शासकीय अधिकारी आदींची बैठक घेऊन कोरोना बाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
सर्व व्यासायिकांनी कोविड चाचणी करून आपण निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दर्शनी भागात लावावे. व्यवसाय करतांना मास्क वापर, सेनेटायझर वापर व सोशल सिस्टकशन राखणे गरजेचे आहे. या सूचनांचे पालन न करणाऱ्याना पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल तर विना मास्क फिरणाऱ्या कडून ५०० रुपये दंड घेण्यात येईल.
गावांत कोविड सेंटर तयार करण्यात यावे व स्थानिक रुग्णांना १४ दिवसांसाठी याठिकाणी रुग्णांना कॉर्नटाईन करण्यात यावे. व घरूनच त्यांना सर्व सुवीधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात याव्यात. कोरोनाची साखळी तुटण्यासाठी यंत्रणेला ग्रामस्थांच्या सहकाऱ्याची गरज असून यंत्रणेला सहकार्य न करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील असा स्पष्ट इशारा डॉ. मांडगे यांनी यावेळी बोलताना दिला.
यावेळी विस्तार अधिकारी राजेश निकुंभ, लोहोणेर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश निकुंभ, योगेश पवार, रमेश आहिरे, सतीश देशमुख, रतीलाल परदेशी, संजय सोनवणे, प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा, मुकुंद मेतकर, निबा धामणे, चंद्रकात शेवाळे, धोंडू आहिरे, ग्रामविकास अधिकारी यु. बी. खैरनार, सुुपरवायझर विजय पवार, सोनाली पाटील आदी उपस्थित होते.