कडक निर्बंध आनंदातून नव्हे कर्तव्य भावनेतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:15 AM2021-05-11T04:15:49+5:302021-05-11T04:15:49+5:30
नाशिक जिल्ह्यात बुधवारपासून कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याबाबत भुजबळ यांनी आपली भावना जनतेसाठी व्यक्त केली. ते म्हणाले, ...
नाशिक जिल्ह्यात बुधवारपासून कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याबाबत भुजबळ यांनी आपली भावना जनतेसाठी व्यक्त केली. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करूनही फक्त दहा ते बारा हजार रुग्ण संख्या कमी होऊ शकली आहे. मात्र, दररोज तीन ते चार हजार रुग्ण वाढतच असून, रुग्णालयात बेड नाही, ऑक्सिजनची कमतरता यासारख्या प्रश्नांशीही सामना करावा लागत आहे. त्यावरही उपाययोजना केल्या जात असताना रुग्ण कमी होण्याची शक्यता दिसत नाही. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील मंत्री, विधानसभा अध्यक्ष व सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येऊन त्यात देखील सर्वांनीच कडक निर्बंध लादण्याबाबतचे मत प्रदर्शित केले आहे. ते पाहता, काही प्रमाणात शेतकरी, दूध व्यावसायिक, किराणा माल विक्रेत्यांचे नुकसान होईल. परंतु आजूबाजूला मृत्यू थैमान घालत असताना ते रोखण्यासाठी अशा प्रकारची पावले उचलणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला याबाबत सहकार्य करावे व कोरोना रोखण्याच्या या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहनही भुजबळ यांनी केले आहे.