जिल्ह्यात आज रात्रीपासून लागणार कडक निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 01:41 AM2021-04-05T01:41:48+5:302021-04-05T01:42:12+5:30

राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध अधिक कठोर करण्यात आले असून रात्री ८ वाजेनंतर मेडिकल्स वगळता सर्व दुकाने बंद राहाणार आहेत. याबाबतची अंमलबजावणी सोमवारी रात्रीपासून केली जाणार असून ३० एप्रिल पर्यंत हे निर्बंध राहाणार  असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

Strict restrictions will be imposed in the district from tonight | जिल्ह्यात आज रात्रीपासून लागणार कडक निर्बंध

जिल्ह्यात आज रात्रीपासून लागणार कडक निर्बंध

Next

नाशिक :  राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध अधिक कठोर करण्यात आले असून रात्री ८ वाजेनंतर मेडिकल्स वगळता सर्व दुकाने बंद राहाणार आहेत. याबाबतची अंमलबजावणी सोमवारी रात्रीपासून केली जाणार असून ३० एप्रिल पर्यंत हे निर्बंध राहाणार  असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
कोरोना आणखी झपाट्याने वाढणार असल्याचा निष्कर्ष आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी काढला आहे. त्यामुळे असलेले निर्बंध अधिक काटेकोर आणि कठोर करण्यात आलेले आहे. 
यामध्ये नागरिकांनी तसेच विविध प्रकारच्या आस्थापनांनी नियमांचे पालन करावे अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत. जिल्ह्यात यापूर्वीच काही निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत आता त्यामध्ये काही प्रमाणात बदल होणार आहे. 
निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.  उद्योग व्यवसाय सुरू राहतील, मात्र यासाठी कोरोना नियमांचे पालन करून कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 
कोरोना बाधित सोसायट्यांना दंड
कोरेानाबाधित असलेल्या सोसायटी इमारतींमध्ये नियमांचे पालन होत नसेल तर त्यांना देखील दहा हजाराचा दंड केला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. बांधकामावरील मजुरांना कामावर बोलवितांना त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था संबंधित बांधकाम व्यावसायिकाने केली पाहिजे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांचे लसीकरण करण्याला प्राधान्य देण्याचे देखील सुचविण्यात आलेले आहे. 

Web Title: Strict restrictions will be imposed in the district from tonight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.