लॉकडाऊनपेक्षा आरोग्य नियमांची कठोर अंमलबाजवणी हवी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:10+5:302021-04-04T04:15:10+5:30
कोरेानाचा संसर्ग वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनीदेखील तसा इशारा दिल्याने लॉकडाऊनच्या भीतीने विक्रेत्यांच्या पाेटात ...
कोरेानाचा संसर्ग वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनीदेखील तसा इशारा दिल्याने लॉकडाऊनच्या भीतीने विक्रेत्यांच्या पाेटात गोळा उठला आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक परिणाम अधिक गंभीर होतात. गोरगरिबांचे रोजगार बुडतात. त्यामुळे राज्य शासनाने कोणताही कठोर निर्णय घेताना विक्रेते, व्यावसायिक,कारागीर, कष्टकरी वर्गाच्या हिताचा विचार करावा, असे मतही या विक्रेत्यांनी व्यक्त केले.
कोट...
कोरोनावर आरोग्य नियमांचे पालन हाच पूर्वदक्षतेचा भाग आहे. त्याबाबत अधिकाधिक जनजागृती झाली पाहिजे. लॉकडाऊनने हा प्रश्न सुटला असता तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ का येत आहे, याचा विचार शासनाने केला पाहिजे.
- कल्पेश सैंदाणे, मेन्स पार्लर, काठे गल्ली.
कोट...
लॉन्ड्री व्यवसाय हातावर काम करणाऱ्यांचा असून लॉकडाऊन झाल्यास उपासमारीची वेळ येते.
गेल्या एक वर्षापूर्वी मार्च महिन्यात झालेल्या लॉकडाऊन दुकान बंद असल्याने उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण होतो. गेल्यावर्षी त्यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले होते. त्यातच जर आता लॉकडाऊन झाले तर उपासमारीशिवाय पर्याय राहणार नाही.
- मुकेश हजारे, लॉन्ड्री व्यवसायिक, इंदिरा नगर.
कोट...
चपला बुट दुरुस्ती हा दररोज कमवायचे आणि संसार चालवायचा असा व्यवसाय आहे महापालिकेच्या परवानगीने छोटीशी टपरी मध्ये सुमारे दहा वर्षापासून फुटवेअर व्यवसाय करीत आहे लॉकडाऊन झाल्यास संसार कसा चालवायचा असा प्रश्न निर्माण होईल.
- संतोष शिलावट, फुटवेअर व्यावसायिक, वडाळा पाथर्डी रोड
कोट...
गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे व्यवसायाला लागलेली घरघर अद्याप सुरूच आहे. यातच शासनाने यंदाच्या वर्षी पुन्हा लॉकडाऊन केल्यास उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. लॉकडाऊन करण्याऐवजी कडक निर्बंध कडक करावे.
- राजू अहिरे, चप्पल बुट व्यावसायिक, सिडको
(सर्वांची छायाचित्रे आर फोटोवर आजच्या तारखेने सेव्ह आहेत.)