घोटी शहरात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 09:49 PM2020-05-27T21:49:16+5:302020-05-27T21:49:46+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या घोटी शहरात रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. शहरात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यामुळे ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून रूग्ण राहत असलेला परिसर कंटेंन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. तर संपूर्ण शहर मेडिकल व दवाखाने वगळता आठ दिवस बंद करण्यात आले आहे.

Strictly closed in the city of Ghoti | घोटी शहरात कडकडीत बंद

घोटी शहरात कडकडीत बंद

googlenewsNext

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या घोटी शहरात रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. शहरात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यामुळे ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून रूग्ण राहत असलेला परिसर कंटेंन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. तर संपूर्ण शहर मेडिकल व दवाखाने वगळता आठ दिवस बंद करण्यात आले आहे.
इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे दररोज दररोज व्यापार व उद्योगांच्या निमित्ताने हजारो नागरिक या ठिकाणी येत असतात. जगभरात कोरोनाने थैमान घातले असून घोटी शहरात देखील कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केल्यामुळे शासनस्तरावरून यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी निर्णय घेण्यात येत असल्यामुळे याच पार्श्वभूमीवर घोटी ग्रामपालिकेचे सरपंच संजय आरोटे यांनी शासनाच्या आदेशानुसार आठवडे बाजार तसेच इतर किरकोळ व्यापारी, घाऊक व्यापारी यांची दुकाने बंद करण्यात आली आहे.
घोटी या शहराचा तालुक्यातील जवळपास १६ गावांशी संपर्कयेत असून या गावातील शेतकरी आपला भाजीपाला घोटी या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन येत असतात. यामुळे या ठिकाणी व्यापारी व विके्र ते यांची मोठी गर्दी जमा होत असते. यामुळे या परिसरातील दुकाने, हॉटेल्स तसेच भाजीपाला विक्रीची दुकाने १ जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाचे जगभरात वाढते प्रमाण पाहता त्यापासून सुरक्षित राहण्याकरिता स्वत: काळजी
घेतली पाहिजे व इतरांचीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामस्थ व व्यापारी यांनी सहकार्य करावे व आदेशाचे पालन करावे असे आवाहन यावेळी घोटी ग्रामपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
जो कोणी या शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करेल किंवा आदेशाचे पालन करणार नाही त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. घोटीमध्ये तालुक्यातील जवळपास १६ गावांमधील नागरिक कामानिमित्त नेहमीच येत असतात. यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते. कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला असून यापासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे.
------------------------
बेलगाव कुºहेत अधिकाऱ्यांकडून पाहणी
इगतपुरी तालुक्यातील घोटी व बेलगाव कुºहे येथे दोन कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळल्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी बेलगाव कुºहे परिसरात पथकासह येऊन पाहणी केली.
रु ग्ण राहत असलेला परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे.
पुणे व मुंबईहून आलेल्या व्यक्तीची माहिती तत्काळ ग्रामपंचायत तसेच नजीकच्या शासकीय रु ग्णालयात देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. वैद्यकीय अधिकारी जी.पी. बांबळे यांनी रु ग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांना तत्काळ क्वॉरण्टाइन करण्यात आले असून नातेवाईक आणि रुग्णास तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

Web Title: Strictly closed in the city of Ghoti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक