लखमापूर येथे पाच दिवस कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 06:23 PM2021-04-18T18:23:27+5:302021-04-18T18:25:30+5:30

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट पसरत असल्यामुळे चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. लखमापूर गावात काही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनात आल्याने अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने पाच दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Strictly closed for five days at Lakhmapur | लखमापूर येथे पाच दिवस कडकडीत बंद

लखमापूर येथे पाच दिवस कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देलखमापूर गावातच विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट पसरत असल्यामुळे चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. लखमापूर गावात काही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनात आल्याने अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने पाच दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोमवारी (दि. १९) सायंकाळी ५ वाजल्यापासून ते शुक्रवार दि. २३ एप्रिलपर्यंत लखमापूर गावात अत्यावश्यक सेवा वगळता किराणा दुकानासहीत इतर सर्व दुकाने बंद राहतील व कडकडीत जनता कर्फ्यू लागू राहील.
या अटी-शर्तीचे पालन न करण्याऱ्या नागरिक, दुकानदार व व्यावसायिक यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग कायदा १८९७ व कोविड-१९ संदर्भातील शासनाचे नियम व परिपत्रकान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच लखमापूर गावातील काही लोकांनी जर वैयक्तिकरित्या खासगी रुग्णालयात जाऊन कोविड-१९ ची तपासणी केली असेल आणि ते जर संक्रमित झाले असतील तर त्यांनी आपली आजारासंबंधीची माहिती लपवून न ठेवता स्थानिक आरोग्य उपचार केंद्रात कळवावी. दरम्यान, लखमापूर गावातच विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार असून कादवा विद्यालयाची जुनी इमारत येथे सुरू करणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांनी दिली.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी
काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा व कोरोना नियमांचे पालन करा. असे ग्रामपंचायत सरपंच संगीता दळवी, उपसरपंच किशोर सोनवणे, ग्रामविकास अधिकारी संजय पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी रविवारी (दि.१८) झालेल्या तातडीच्या बैठकीत जनतेला आवाहन केले.

Web Title: Strictly closed for five days at Lakhmapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.