जिल्ह्यातील ४० हजार कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:52 AM2018-08-07T01:52:53+5:302018-08-07T01:53:17+5:30

राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपात जिल्ह्णातील विविध विभागांतील सुमारे ४० हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपामुळे शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प होणार असून, सलग तीन दिवस चालणाऱ्या संपामुळे पुढील आठवडाभर कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा परिषद आणि शिक्षक संघटनांची केवळ एकाच दिवसाचा संप पुकारला असून, त्यानंतर त्यांचे कामकाज सुरू होणार आहे.

 Strike 40 thousand employees in the district | जिल्ह्यातील ४० हजार कर्मचारी संपावर

जिल्ह्यातील ४० हजार कर्मचारी संपावर

Next

नाशिक : राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपात जिल्ह्णातील विविध विभागांतील सुमारे ४० हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपामुळे शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प होणार असून, सलग तीन दिवस चालणाऱ्या संपामुळे पुढील आठवडाभर कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा परिषद आणि शिक्षक संघटनांची केवळ एकाच दिवसाचा संप पुकारला असून, त्यानंतर त्यांचे कामकाज सुरू होणार आहे.  राज्य सरकारी कर्मचाºयांच्या प्रश्नांसदर्भात मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊनही त्यातून समाधानकारक तोडगा न निघाल्याने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने संपाची हाक दिलेली आहे. या संपात नाशिक जिल्ह्णातील सुमारे ४० हजारांपेक्षा अधिक कर्मचारी सहभागी होणार असल्याने सरकारी कामकाज ठप्प पडणार आहे. यामध्ये सर्वांत मोठी संख्या महसूल कर्मचाºयांची असून, जिल्हा परिषद, पाटबंधारे, वनविभाग, जिल्हा रुग्णालय, धर्मादाय आायुक्त तसेच शिक्षक-शिक्षकेतर संघटनांचे कर्मचारी असे सर्व या संपात सहभागी होत आहेत. संपाच्या नियोजनासाठी शासकीय कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर सायंकाळी द्वारसभा घेण्यात आल्या.  जिल्ह्णात या संपाविषयी गेल्या महिनाभरापासून नियोजन सुरू आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा बैठका, चर्चा आणि संबंधित विभागांच्या प्रमुखांना मागण्यांचे निवेदने देण्यात आलेली आहेत. कर्मचाºयांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी द्वारसभा, पत्रके काढण्यात आली होती. या आंदोलनात मात्र लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला.  महसूल कर्मचाºयांनंतर जिल्हा परिषद कर्मचाºयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एक दिवस जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प होणार असले तरी महसूल कामे पूर्णपणे ठप्प होणार आहे. दरम्यान, प्रत्येक शासकीय कार्यालयासमोर कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असून, दिवसभर घोषणाबाजी, निदर्शने केली जाणार आहेत.

Web Title:  Strike 40 thousand employees in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप