पावसाचा खरीप पिकांना तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 09:38 PM2019-10-31T21:38:22+5:302019-10-31T21:42:36+5:30
खेडलेझुंगे/कसबेसुकेणे : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका द्राक्षबागांसह इतर खरीप पिकांना बसला असून पिकांच्या नुकसानीने बळीराजा हवालदिल झाला आहे. द्राक्षबागांमध्ये ...
खेडलेझुंगे/कसबेसुकेणे : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका द्राक्षबागांसह इतर खरीप पिकांना बसला असून पिकांच्या नुकसानीने बळीराजा हवालदिल झाला आहे. द्राक्षबागांमध्ये पाणी साचू लागल्याने सडण्याची भीती व्यक्त केली जात असून ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका बसत आहे.
खेडलेझुंगे, रु ई-धानोरे, कोळगाव, सारोळेथडी, धारणगाव परिसरासह पावसामुळे द्राक्षबागांवर डावणी, भुरी, कूज, गळ या रोगांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे झालेला लाखो रु पयांचा खर्च वाया जाणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे परिसरातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी द्राक्षबागा तोडण्याच्या बेतात आहेत. परिसरातील नानासाहेब खडांगळे आणि राजेंद्र जाधव यांनी द्राक्षबागा तोडण्यास सुरुवात केलेली आहे. तसेच काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून नेल्याचे चित्र परिसरामध्ये आहे. काढणीला आलेला कांदा, मका, बाजरी, सोयाबीन व भुईमूग या पिकांना या पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतात पाणी साचल्याने काढणी केलेले बाजरी पीक पावसापासून वाचविण्यासाठी महागडे प्लॅस्टिक कागद खरेदी करून झाकण्यात आले; परंतु पंधरवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जमिनीतील ओल कायम राहिली. त्यातच शेतातून काढणी केलेल्या बाजरीच्या कणसांना सुकण्यासाठी ऊन मिळाले नाही. काढणी केलेली कणसे पावसापासून वाचविण्यासाठी एका ठिकाणी गंज करून झाकण्यात आली; परंतु कणसांना जमिनीतून ओल मिळाल्याने सदरच्या कणसांना मोठ्या प्रमाणावर कोंब फुटले. त्यामुळे मरळगोई येथील प्रमोद दरेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील नुकसानग्रस्त पिकांचा महसूल आणि कृषी विभागाकडून त्वरित पंचनामा होऊन शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणे गरजेचे आहे. सदर पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे. दिवाळी सणामुळे सुट्टीवर गेलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी तातडीने हजर होऊन पंचनामे करणे गरजेचे असल्याची भावना शेतकºयांनी व्यक्त केली. सततच्या पावसामुळे द्राक्षबागांवर डावणी, बुरशींच्या मोठ्या प्रमाणावरील प्रादुर्भावामुळे द्राक्षबागांवर कुºहाड लावण्याची वेळ बºयाच शेतकºयांवर येऊन ठेपली आहे. रु ई-धानोरे येथील नानासाहेब खडांगळे यांनी द्राक्षबागांवर डावणी व बुरशी आल्याने सुमारे दीड एकर द्राक्षबाग तोडून टाकली. बुरशी व डावणीमुळे त्यांचा द्राक्षबाग पूर्णत: संपल्याने त्यांना द्राक्षबाग तोडून टाकावी लागली आहे. छाटणी ते द्राक्ष डिपिंगपर्यंतचा खर्च आणि आज द्राक्षबाग तोडण्यासाठी २ ते ३ रु पये प्रतिझाडाच्या खर्चामुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी. जर तसे झाले नाही तर शेतकºयांपुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसेल, असे रूई-धानोरे येथील द्राक्ष उत्पादक नानासाहेब खडांगळे यांनी सांगितले. द्राक्ष पिकांसाठी औषधे व खतांचा मोठा खर्च झाला असून, शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला आहे. त्यामुळे शासनाने या परिसरातील पिकांचा पंचनामा करून तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
धारणगाववीर व खडक परिसरामध्ये नवरात्र आणि दीपावली सणाचे औचित्य साधून झेंडूची लागवड करण्यात आली होती. झेंडूच्या फुलांना भाव मिळून पैसा मिळेल यादृष्टीने लागवड केलेल्या झेंडूला परतीच्या पावसाने शेतकºयांची निराशा केली. परतीच्या पावसाच्या तीव्रतेमुळे झेंडूचे नुकसान झाले आहे. झेंडूच्या झाडांची मोडतोड झाली आहे. त्यावरील फुले मातीमिश्रित झाल्याने धारणगाव खडक येथील सुभाष जाधव यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतावर काढणी केलेले पीक पावसामुळे सुरक्षित ठिकाणी वाहतूक करता येत नसल्याने शेतातच सडू लागले आहे. मका, बाजरी, भुईमुगाला कोंब फुटले आहे. मागील वर्षी दुष्काळामुळे चाºयाची टंचाई निर्माण झाली होती; परंतु यावर्षी परतीच्या पावसामुळे चारा जमिनीवरच पडून असल्याने सडू लागला आहे. त्यामुळे यावर्षी चाराटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. परतीच्या पावसाची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले, चाºया, पाट, कालवे तुडुंब भरून वाहत आहेत. जास्तीचे पाणी शेतात साचून असल्याने शेतपिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.