कोरोनामुक्त कळवणमध्ये पुन्हा एकाला बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:36 PM2020-06-19T22:36:57+5:302020-06-20T00:27:31+5:30

कळवण : कोरोनामुक्त झालेल्या कळवण तालुक्यात पुन्हा एकदा करोनाचा शिरकाव झाला असून मानुर गावातील शासकीय कार्यालयातील ५४ वर्षीय कर्मचाऱ्याचा ...

Strike one again in the corona-free report | कोरोनामुक्त कळवणमध्ये पुन्हा एकाला बाधा

कोरोनामुक्त कळवणमध्ये पुन्हा एकाला बाधा

Next
ठळक मुद्देमानूरचा कर्मचारी बाधित : २१ जण होम क्वॉरण्टाइन; शहरवासीय चिंतित

कळवण : कोरोनामुक्त झालेल्या कळवण तालुक्यात पुन्हा एकदा करोनाचा शिरकाव झाला असून मानुर गावातील शासकीय कार्यालयातील ५४ वर्षीय कर्मचाऱ्याचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने कळवणकरांच्या पुन्हा एकदा चिंता वाढल्या आहेत.
मानूर येथील कोरोना बाधित रु ग्णाच्या संपर्कातील २१ जणांना होम क्वारण्टाइन करण्यात आले असून त्यापैकी दोन जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात एका खाजगी डॉक्टराचाही समावेश असल्याचे समजते. दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मानूर ग्रामपंचायतीने गावात जंतुनाशक फवारणी केली आहे. एकीकडे जिल्ह्यात करोना चा संसर्ग वाढत असताना कळवण तालुक्यात मात्र सद्यस्थितीत एकही रु ग्ण नव्हता. मागील महिन्यात एका अकरा वर्षीय मुलाच्या रूपाने पहिला पॉझिटीव्ह रुग्ण आढळला होता. मात्र त्यात कुठलीही लक्षणे नसल्याने आणि त्याच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने कळवणकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र आता पुन्हा एकही रु ग्ण संख्या नसलेल्या कळवण तालुक्यात रु ग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित रु ग्ण हा ५४ वर्षीय पुरु ष असून ते मानूर येथेच वास्तव्यास आहेत.
मात्र मूळचे जळगाव जिल्ह्यातील यावल येथील रहिवासी आहेत. सोमवारी (दि.१५) त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याचे स्वॉब घेऊन त्यांना मालेगाव येथे क्वारण्टाइन करण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्राप्त होऊन तो पॉझिटीव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पाटील यांनी दिली.
संबंधित रु ग्ण राहत असलेला परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला असून मानुर गावात बफर झोन जाहीर करण्यात आला आहे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून आरोग्य विभागाकडून परिसराचा सर्व्हे करण्यात आला रु ग्णाच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणी साठी पाठवले जाणार आहेत. कोरोनाचा शिरकाव झाल्याने मानुरसह कळवणकरांची चिंता वाढली आहे.
कळवण तालुक्यातील मानूर येथे वास्तव्यास असलेल्या एका शासकीय कार्यालयातील ५४ वर्षीय कर्मचाºयाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्याच्या नजीकच्या संपर्कातील हाय रिस्क मधील दोन व्यक्ती तर लो रिस्क मधील १९ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. संबंधित कर्मचारी काम करत असलेले शासकीय कार्यालय मानूर येथेच असून हे कार्यालय सील करण्यात आले आहे.

Web Title: Strike one again in the corona-free report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.