दांडिया खेळताना धक्का लागल्याने एकावर वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:45 IST2018-10-20T00:44:56+5:302018-10-20T00:45:15+5:30
दांडिया खेळताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांनी चाकूने वार केल्याची घटना बुधवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास जुने नाशिकमधील शीतळादेवी मंदिरासमोर घडली़

दांडिया खेळताना धक्का लागल्याने एकावर वार
नाशिक : दांडिया खेळताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांनी चाकूने वार केल्याची घटना बुधवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास जुने नाशिकमधील शीतळादेवी मंदिरासमोर घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नानावलीच्या संभाजी चौकातील आकाश परदेशी हा युवक धर्मवीर संभाजी मित्रमंडळ येथे गरबा खेळत होता़ रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गरबा खेळताना आलेला घाम परदेशी पुसत असताना त्याचा धक्का शेजारी नाचत असलेल्या दोन तरुणांना लागला़ त्यांनी परदेशी यास ‘तुझा भाऊ खाली उभा असून बोलावले आहे,’ असे म्हणून दुचाकीवर बसवून शीतळादेवी मंदिरासमोरील रोडवर नेले. यानंतर या दोघांनी परदेशी यास दुचाकीवरून खाली उतरवून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली़ यापैकी एकाने आपल्याकडील चाकू काढून परदेशीच्या कपाळावर वार केले़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़