नाईक शिक्षण संस्थेच्या सभेत धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:42 AM2018-12-31T01:42:29+5:302018-12-31T01:43:04+5:30
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काही तरुणांनी नवीन सभासद नोंदणीसाठी आग्रह धरला. त्यामुळे गोंधळ झाला. सत्ताधारी गटाच्या समर्थकांनी मागणी करणाऱ्यांपैकी काही जणांना धक्काबुक्की करीत सभास्थळावरून बाहेर काढल्याने सभेला गालबोट लागले.
नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काही तरुणांनी नवीन सभासद नोंदणीसाठी आग्रह धरला. त्यामुळे गोंधळ झाला. सत्ताधारी गटाच्या समर्थकांनी मागणी करणाऱ्यांपैकी काही जणांना धक्काबुक्की करीत सभास्थळावरून बाहेर काढल्याने सभेला गालबोट लागले.
के. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेची चालू पंचवार्षिक कार्यकालातील अखेरची सभा रविवारी (दि.३०) संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी माजी मंत्री तुकाराम दिघोळे व आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, पांडुरंग धात्रक, अॅड. तानाजी जायभावे, भगवान सानप, संपत वाघ, साहेबराव कु टे आदींसह सभासद उपस्थित होते. या सभेत गेल्या ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेला वसंत मार्के टच्या इमारतीचा मुद्दा पुन्हा एकदा गाजला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा संस्थेचे आजीव सभासद पंढरीनाथ थोरे यांच्यासह मनोज बुरकुले, अॅड. अशोक अव्हाड, पी. आर. गिते आदींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना सत्ताधारी गटाकडून सरचिटणीस हेमंत धात्रक व अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी उत्तर देत सभासदांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढील कामकाजास सुरुवात होताच काही तरु णांनी अचानक नवीन सभासद नोंदणीसाठी आग्रही भूमिका घेत संस्थेच्या आवारात आंदोलनात्मक पवित्र्यात फलक झळकावले. दत्तू बोडके, प्रसाद सानप, अनिल भडांगे, सचिन दराडे, गणेश बर्के, बाळू सांगळे आदी तरु णांनी व्यासपीठाकडे धाव घेतली. त्यांना अध्यक्षांनी या विषयावर ऐनवेळच्या विषयांमध्ये चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु, तरुणांचे समाधान झाले नाही. याचवेळी सत्ताधारी गटाच्या समर्थक सभासदांनी गोंधळ घालणाºया तरुणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याने बाचाबाची होऊन दोन्ही गट आमने-सामने आले. यात सताधारी गटाच्या बाजुने भूमिका घेणाºयांनी काही तरुणांना धक्काबुक्की केल्याने हे प्रकरण अधिक चिघळून काही काळ तणाव निर्माण झाला.
बाळासाहेब सानप यांची मध्यस्थी
के. व्ही. एन. शिक्षण संस्थेत नवीन सभासद नोंदणी करून घ्यावी या मागणीसाठी तरु णांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याने वार्षिक सभेत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आमदार बाळासाहेब सानप यांनी मध्यस्थीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी संस्थेचे संचालक प्रकाश घुगे यांच्यासोबत नवीन सभासद नोंदणीची मागणी करणाºया आंदोलक गटाशी चर्चा करीत मुद्द्यावर ७ जानेवारी रोजी बैठकही बोलविली आहे.
विरोधकांचे षडयंत्र
च्वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामाआव्हाड आणि सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केलेले षडयंत्र असल्याचा आरोप केला. विरोधकांच्या हातात सत्ताधारी गटाविरोधात कोणताही मुद्दा नसल्याने त्यांनी ३५ वर्षांपूर्वीचा वसंत मार्केट इमारतीच्या टेरेसचा मुद्दा लावून धरला आहे. परंतु, हा मुद्दा सभासद मतदारांसमोर टिकणारा नसल्याने त्यांनी बाहेरच्या गुंडांच्या मदतीने गोंधळ घातल्याचा आरोपही यावेळी केला.