पोलिसांतील तक्रार मागे घेत नसल्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 06:12 PM2018-08-11T18:12:36+5:302018-08-11T18:15:23+5:30

नाशिक : वर्षभरापुर्वी पोलिसात दाखल केलेल्या अदखलपात्र (एनसी) तक्रारीमुळे दहा हजार रुपये खर्च झाला असून पैसे दे व तक्रार मागे घे असे म्हणून दोघांनी एकास जबर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़१०) सायंकाळी पळसे बस स्टँडजवळ घडली़

 Striking of police complaint | पोलिसांतील तक्रार मागे घेत नसल्याने मारहाण

पोलिसांतील तक्रार मागे घेत नसल्याने मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्दे पळसे बस स्टँडजवळ घटना

नाशिक : वर्षभरापुर्वी पोलिसात दाखल केलेल्या अदखलपात्र (एनसी) तक्रारीमुळे दहा हजार रुपये खर्च झाला असून पैसे दे व तक्रार मागे घे असे म्हणून दोघांनी एकास जबर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़१०) सायंकाळी पळसे बस स्टँडजवळ घडली़

हिंमत हिरामण ताजनपुरे (३६, चेहेडी पंपिंग, नाशिकरोड) यांनी पोलिसांत दिलेल्या फियार्दीनुसार शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते पळसे बस स्टँडजवळील हॉटेल साई येथे उभे होते़ यावेळी संशयित सोमनाथ कचेश्वर ताजनपुरे (रा. चेहेडी) व गोकुळ (पूर्ण नाव माहीत नाही) हे तिथे आले व त्यांनी वर्षभरापुर्वी तुज्या वडिलांनी माझ्यावर पोलिसांत तक्रार दिली होती.

यासाठी माझा दहा हजार रुपयांचा खर्च झाला असून मला ते पैसे परत दे व तक्रार मागे घे असे म्हणून शिवीगाळ सुरू केली़ या दोघांना हिंमत ताजनपुरे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी आपल्या हातातील बाटली व ग्लास हिंमत ताजनपुरे यांच्या डोक्यात मारून फेकल्याने ते जखमी झाले 

तर संशयित गोकुळ याने हिंमत ताजनपुरे यांच्या पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी या दोन संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Striking of police complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.