साठेबाजी, भाववाढ करणाऱ्यांवर कठोर कारवाई ; जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 07:51 PM2020-03-26T19:51:23+5:302020-03-26T19:54:17+5:30
जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत साठेबाजी, दरवाढीच्या संदर्भात तक्रारी आल्यानंतर संबंधित अधिकाºयांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोणत्याही परिस्थितीत साठेबाजी आणि भाववाढ अस्वीकारार्ह असल्याचे स्पष्ट केले आहे.
नाशिक : जीवनावश्यक वस्तू विक्रे त्या दुकानदारांनी आपली दुकाने सुरू ठेवावीत. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंची विक्री करताना मालाची साठवणूक करणे, वस्तूंची भाववाढ अथवा विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही, असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत साठेबाजी, दरवाढीच्या संदर्भात तक्रारी आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोणत्याही परिस्थितीत साठेबाजी आणि भाववाढ अस्वीकारार्ह असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विनाअडथळा व व्यवस्थितरीत्या मिळावा तसेच सर्वप्रकारचे दैनंदिन अत्यावश्यक व्यवहार सुरळीत रहावे यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत माहिती आणि मदतीसाठी ‘टीम संकट सोबती’ तयार करण्यात आली आहे. यामध्ये एकूण १७ अधिकारी कार्यरत आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याकडे वेगवेगळे विषय देण्यात आले असून, संबंधित अधिकाºयांचे संपर्क क्रमांक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर दिले आहेत. या परिस्थितीमध्ये नागरिकांना काही अडचणी येत असतील त्यांनी संबंधित अधिकाºयाला संपर्क केल्यास त्यांच्या अडचणींची सोडवणूक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किराणा दुकानांमध्ये किंवा मेडिकलमध्ये कामासाठी येणारा मजूर हा व्यवस्थित आपल्या कामावर जाईल, यासाठी शहर व ग्रामीण पोलीस प्रशासन यांनीदेखील हेल्पलाइन सुरू केली आहे. किराणा दुकाने व मेडिकलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या कमीत कमी ठेवणे बंधनकारक आहे. दरम्यान, कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.