योगाच्या माध्यमातून मन:शांतीसाठी प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 01:19 AM2019-11-10T01:19:57+5:302019-11-10T01:20:11+5:30
केवळ योगासने करणे म्हणजे योगा नसून योगाच्या माध्यमातून प्रसिद्धी, विश्वविक्रम यांच्यामागे न धावता, तसेच शरीराला त्रास करवून न घेता आपल्या मनाला काय मिळाले याचा विचार करून योग, प्राणायामातून मन:शांती मिळविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन स्वामी शिवराजानंद सरस्वती यांनी केले.
नाशिक : केवळ योगासने करणे म्हणजे योगा नसून योगाच्या माध्यमातून प्रसिद्धी, विश्वविक्रम यांच्यामागे न धावता, तसेच शरीराला त्रास करवून न घेता आपल्या मनाला काय मिळाले याचा विचार करून योग, प्राणायामातून मन:शांती मिळविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन स्वामी शिवराजानंद सरस्वती यांनी केले.
शहरात ठक्कर डोम येथे सुरू असलेल्या ‘स्वत:ला वाचा’ योगोत्सव भारत योग यात्रा २०१९ मध्ये शनिवारी (दि. ९) दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात महामृत्युंजय मंत्रसर यज्ञ हवन करण्यात आले. महामृत्युंजय मंत्राचे सलग १०८ वेळा सार्वजनिकरीत्या पठण करीत जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. जगभरातील स्वामी सत्यानंद परंपरेच्या आश्रमात आणि केंद्रात दर शनिवारी स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी, तणाव दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्रासह हवन होते. त्याच पार्श्वभूमीवर योग यात्रेत शनिवारी यज्ञ करण्यात आला.
योगोत्सवातील दुसºया दिवशीच्या सकाळच्या सत्रात स्वामी कैवल्यानंद सरस्वती यांनी साधकांकडून विविध आसने करून घेतली. योगोत्सवाचा रविवारी अखेरचा दिवस असून, सकाळच्या सत्रात साडेसहा ते साडेआठ वाजेदरम्यान होणाºया योगनिद्रेची अनुभूती योगाभ्यसकांना घेता येणार आहे.