भागोजी नाईक यांच्या स्मारकासाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:15 AM2021-01-23T04:15:15+5:302021-01-23T04:15:15+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील भूमिपुत्र व आद्यक्रांतिकारक भागोजी नाईक यांच्या भव्य स्मारकासाठी केंद्रातून निधी उपलब्ध करून ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील भूमिपुत्र व आद्यक्रांतिकारक भागोजी नाईक यांच्या भव्य स्मारकासाठी केंद्रातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिले.
बुद्धविहार लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार राजाभाऊ वाजे होते. विचारमंचावर म्हाडाचे शिवाजीराव ढवळे, खा. हेमंत गोडसे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, सभापती शोभा बर्के, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, काकासाहेब खंबाळकर, प्रशांत दिवे, युवा नेते उदय सांगळे, सरपंच गोपाळ शेळके, उपसरपंच कविता सानप, बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव शेळके, आनंदराव शेळके, विनायकराव शेळके, शंकरराव शेळके, दीपक बर्के आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आठवले यांनी आपल्या खुमासदार शैलीत राजकारणातील स्व. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यातील अनेक किस्से सांगून उपस्थितांना खळखळून हसविले. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाप्रमाणे क्रांतिवीर भागोजी नाईक यांच्या स्मारकासाठी खासदार निधी व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, राज्यमंत्री शिवाजीराव ढवळे, खा. हेमंत गोडसे, प्रशांत दिवे, काकासाहेब खंबाळकर ,मंगेश जाधव आदींची भाषणे झाली. उत्तर महाराष्ट्राचे आरपीआयचे सचिव काशिनाथ भालेराव, नगराध्यक्ष किरण डगळे, पंचायत समितीचे उपसभापती संग्राम कातकाडे, गोविंद लोखंडे, शैलेश नाईक, जगनपाटील भाबड, राजेश गडाख, श्रीकांत जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंदराव शेळके यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शशिकांत येरेकर यांनी तर सरपंच गोपाळ शेळके यांनी आभार मानले.
चौकट :
आठवलेंचे काव्यतुषार
आठवले यांचे नेहमीप्रमाणेच खुमासदार भाषण रंगले. आठवले म्हणाले, लोकांना वाटते आठवले मंत्रिपदासाठी पक्ष बदलतात पण तसे नाही. मी जिकडे जातो तो पक्ष सत्तेवर येतो व माझ्यामुळे इतरांना मंत्रिपद मिळते. यावेळी आठवले यांनी काव्यपंक्तीतूनही मनोरंजन केले. ‘आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा, कारण आम्हाला इतिहास घडवायचा आहे नवा’, ‘हे गाव विचाराने आहे फारच मोठे , त्याचे नाव आहे नांदूर-शिंगोटे, मी कधीच बोलत नाही खोटे, म्हणून राजकारणात होत नाहीत माझे तोटे’ या काव्यपंक्तींनी उपस्थितांना खळखळून हसविले.
फोटो - २२ बुद्ध स्मारक
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे बुध्द विहाराचे लोकार्पण देशाचे सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी राजाभाऊ वाजे, हेमंत गोडसे, शिवाजीराव ढवळे, शीतल सांगळे, उदय सांगळे, शोभा बर्के, संग्राम कातकाडे, काकासाहेब खंबाळकर, प्रकाश लोंढे, प्रशांत दिवे, गोपाल शेळके, कविता सानप, दीपक बर्के आदी.
===Photopath===
220121\22nsk_25_22012021_13.jpg
===Caption===
फोटो - २२ बुद्ध स्मारक सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे बुध्द विहाराचे लोकार्पण देशाचे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी राजाभाऊ वाजे, हेमंत गोडसे, शिवाजीराव ढवळे, शीतल सांगळे, उदय सांगळे, शोभा बर्के, संग्राम कातकाडे, काकासाहेब खंबाळकर, प्रकाश लोंढे, प्रशांत दिवे, गोपाल शेळके, कविता सानप, दीपक बर्के आदी.