ग्लोबल व्हिजन स्कूलतर्फे सुदृढ बालक स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:12 AM2019-11-17T00:12:54+5:302019-11-17T00:13:37+5:30
ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलतर्फे उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलमध्ये बाल दिन सप्ताहनिमित्त आयोजित सुदृढ बालक स्पर्धेत मुलांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात, या विषयावर उपस्थित पालकांना बालरोगतज्ज्ञ डॉ. संगीता लोढा यांनी मार्गदर्शन केले.
नाशिक : ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलतर्फे उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलमध्ये बाल दिन सप्ताहनिमित्त आयोजित सुदृढ बालक स्पर्धेत मुलांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात, या विषयावर उपस्थित पालकांना बालरोगतज्ज्ञ डॉ. संगीता लोढा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर डॉ. शीतल पगार, मच्छिंद्रनाथ बोरसे उपस्थित होते.
यावेळी पोषण आहार या विषयावर डॉ. शीतल पगार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, लहान मुलांना नेहमी काही तरी खाण्यासाठी काही नवीन हवे असते. बाजारात जसे लहान मुलांना भुरळ घालणाऱ्या जाहिराती, प्रलोभने, आकर्षक पॅकिंग आणि चटपटीत पदार्थ यांचा वापर करून मुलांना जंक फूड घेण्यास प्रवृत्त करतात, हे टाळावे त्या ऐवजी घरातच सत्त्व टिकून राहतील आणि मुलांना चवीला चांगले लागतील, असे पदार्थ बनवावे.
याप्रसंगी डॉ. संगीता लोढा यांनी सांगितले की, लहान मुलांसमोर सतत चांगल्या गोष्टी करत राहिलो तर त्यांना देखील चांगल्या गोष्टी करण्याची सवय लागते. मुलांच्या आहाराबाबत पालकांनी दक्ष राहिले पाहिजे, विशेष माता पालकांनी आपल्या मुलांना काय आवडते तसेच त्याला काय खायला द्यायला हवे याचा विचार करायला हवा त्यानुसार आहार तयार करावा, असेही त्यांनी सांगितले.
प्रश्नमंजुषा स्पर्धा
फोटोजेनिक फेस रेवांशी विसपुते हिने पटकावला. यावेळी माता पालकांसाठीदेखील प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. ज्यामध्ये पहिला क्र मांक लीना विसपुते, दुसरा क्र्रमांक माधुरी बोरसे, तर तिसरा क्रमांक पूनम सोनजे व माधुरी पुराणिक यांनी पटकावला. विजेत्यांना डॉ. संगीता लोढा, डॉ. शीतल पगार, मच्छिंद्रनाथ बोरसे, शाळेच्या संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्र मात बालगोपाळांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्र मात मुलांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. यावेळी शाळेचे समन्वयक, शाळेच्या शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. या सूत्रसंचालन रागिणी तांबोळी यांनी केले.
सिटी सेंटर मॉलमध्ये ‘सुदृढ बालक स्पर्धा’ घेण्यात आली. या स्पर्धेत वय वर्ष ९ पर्यंतच्या मुलांचे वजन, उंची तपासली गेली आणि त्यांच्या सुदृढतेची परीक्षा घेतली गेली. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. शीतल पगारे, डॉ. संगीता लोढा यांनी केले. या स्पर्धेत पहिला क्र मांक हेरंब कुलकर्णी, दुसरा क्रमांक युगंधर मोजाड, तिसरा अद्विका रणशिवे यांनी पटकावला.