गावित विरोधकांचे कॉँग्रेसला बळ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:09 AM2019-10-06T00:09:00+5:302019-10-06T00:11:01+5:30
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेस, शिवसेनेसह मनसे, वंचित आघाडी हे राजकीय पक्ष उतरले असले तरी, कॉँग्रेस आणि शिवसेना असा पारंपरिक सामना पुन्हा एकदा रंगणार हे निश्चित झाले आहे. मात्र, माजी आमदार निर्मला गावित यांच्या शिवसेना प्रवेशानंतर निर्माण झालेल्या विरोधाचा धुराळा बसल्याचे गावित समर्थकांकडून सांगितले जात असले तरी, पक्षांतर्गत विरोधकांकडून कॉँग्रेसच्या उमेदवाराला अप्रत्यक्षरीत्या बळ पुरविले जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेस, शिवसेनेसह मनसे, वंचित आघाडी हे राजकीय पक्ष उतरले असले तरी, कॉँग्रेस आणि शिवसेना असा पारंपरिक सामना पुन्हा एकदा रंगणार हे निश्चित झाले आहे. मात्र, माजी आमदार निर्मला गावित यांच्या शिवसेना प्रवेशानंतर निर्माण झालेल्या विरोधाचा धुराळा बसल्याचे गावित समर्थकांकडून सांगितले जात असले तरी, पक्षांतर्गत विरोधकांकडून कॉँग्रेसच्या उमेदवाराला अप्रत्यक्षरीत्या बळ पुरविले जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
मतदारसंघाचा कानोसा घेतला असता, दोन टर्म मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निर्मला गावित यांनी हॅट्िट्रक साधण्यासाठी पक्षच बदलला असला तरी मतदारांमध्ये मात्र यंदाचा आमदारच बदलण्याची मानसिकता दिसून येत आहे. कॉँग्रेसकडून मतदारसंघाचे दोनदा नेतृत्व करणाºया निर्मला गावित यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हाती शिवबंधन बांधल्यानंतर मतदारसंघात शिवसेना-भाजपतील इच्छुकांमध्ये विरोधाचा ज्वालामुखी भडकला.
शिवसेनेने गावित यांना उमेदवारी दिल्यास सर्वपक्षीय एकच उमेदवार देण्याचाही निर्णय झाला. दरम्यान, अपेक्षेप्रमाणे सेनेने गावित यांना उमेदवारी दिली आणि राष्टÑवादीच्या हिरामण खोसकर यांनीही पक्षांतर करीत कॉँग्रेसकडून उमेदवारी मिळविली.
गावित यांचा अर्ज भरताना माजी आमदार शिवराम झोले यांनी हजेरी लावली, तर माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी अनामत भरली; पण अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे गावित विरोधकांनी आपली तलवार म्यान केल्याचे एकीकडे सांगितले जात असले तरी, अप्रत्यक्षरीत्या विरोधकांकडून कॉँग्रेसच्या उमेदवाराला बळ पुरविले जाण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गावित यांची डोकेदुखी वाढणार आहे. गावित यांच्यावर उपसा जलसिंचन योजनेत १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याशिवाय, दोन टर्म प्रतिनिधित्व करूनही मतदार संघातील पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांबाबत दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. दुर्गम भागात अद्यापही आरोग्य सेवा पोहोचलेल्या नाहीत, तर आहे त्या सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यांत बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. त्याबाबतही विद्यमान आमदारांनी ठोस कृती केली नसल्याचा सूर विरोधकांकडून ऐकायला मिळत आहे. गावित या नाशिकमध्येच जास्त वास्तव्यास असल्याने यंदा नाशिकचे पार्सल परत पाठविण्याची तयारी केली असल्याची संतप्त प्रतिक्रियाही ऐकायला मिळाली. प्रांतवादाचा मुद्दा ऐरणीवर निर्मला गावित या नाशिकच्या असल्याने भूमिपुत्रांना न्याय देण्याची भूमिकाही मतदारांमध्ये अधिक बळावल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचारात प्रांतवादाचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे. मतदारसंघ युतीच्या जागावाटपात भाजपला न सुटल्याने भाजपमधील इच्छुकांमध्ये नाराजीची भावना दूर झालेली नाही. याशिवाय, सेनेतील इच्छुकांना शांत केल्याचे सांगितले जात असले तरी, सेना-भाजपतील नाराज गटाकडून अप्रत्यक्षरीत्या कॉँग्रेसला बळ पुरविले जाण्याची चर्चा आहे. कळीचे मुद्देसर्वाधिक धरणांचा तालुका असूनही पिण्याच्या पाण्यासाठी महिलावर्गाला करावी लागणारी वणवण.
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे हा घटकही नाराज आहे.
उपसा जलसिंचन योजनेतील गैरव्यवहारा- तील आरोपांमुळे मतदारांमध्ये संशयाचे मळभ दाटलेले आहे. न केलेल्या कामांचे श्रेय घेण्यामुळेही वाढता रोष आहे.