अभोणा परिसरात पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 02:58 PM2019-07-31T14:58:04+5:302019-07-31T14:58:17+5:30

अभोणा - पावसाचा तालुका म्हणुन ओळख असलेल्या कळवण तालुक्यास यंदा संपुर्ण जुन सह जुलैच्या मध्यापर्यन्त वाट बघावयास लावणार्या पावसाने मात्र, २१ जुलैपासुन दाखविलेल्या आभाळ मायेने अभोणे शहर परिसरासह संपुर्ण तालुक्यात धो-धो बरसत मोठा दिलासा दिला आहे.

A strong presence of rain in the area of Avona | अभोणा परिसरात पावसाची दमदार हजेरी

अभोणा परिसरात पावसाची दमदार हजेरी

Next

अभोणा - पावसाचा तालुका म्हणुन ओळख असलेल्या कळवण तालुक्यास यंदा संपुर्ण जुन सह जुलैच्या मध्यापर्यन्त वाट बघावयास लावणार्या पावसाने मात्र, २१ जुलैपासुन दाखविलेल्या आभाळ मायेने अभोणे शहर परिसरासह संपुर्ण तालुक्यात धो-धो बरसत मोठा दिलासा दिला आहे. सन १९७३ नंतर प्रथमच कळवणसह संपुर्ण कसमादे साठी वरदान ठरणार्या चणकापुर प्रकल्पाने तळ गाठला होता. तर पश्चिम आदिवासी पट्टयातील लहान मोठे लघुपाटबंधारे प्रकल्पही कोरडेठाक पडल्याने पाणीटंचाईचे सावट गडद झाले होते. मात्र तालुक्यासह चणकापुर व पुनंद पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने धरणातील पाणी साठयात लक्षणीय वाढ होत असुन साठा ५० टक्क्यांवर गेला आहे. चणकापुरमधुन ३० जुलैला या पावसाळ्यात पहिल्यांदाच तीन हजार क्युसेकने गिरणा नदीपात्रात तसेच चणकापुर उजव्या कालव्यास ६० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज अखेर चणकापुर धरणात १३७० दशलक्ष घनफुट पाणीसाठा झाला आहे. तर पुनंद धरणात ७०० दशलक्ष घनफुट साठा झाला असुन धरणातुन ३१३९ क्युसेक पाणी सोडले जात आहे. गिरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असलेल्या पुरपाण्यामुळे नदीकाठावरील गावांना दिलासा मिळाला असुन या प्रकल्पांवर अवलंबुन असलेल्या कसमादेतील विविध पाणीपुरवठा योजनांना फायदा होणार आहे. दरम्यान सप्तशृंग गडाला पाणीपुरवठा करणारा भवानी पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे तेथील पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

Web Title: A strong presence of rain in the area of Avona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक