जीपीएस यंत्रणा असलेल्या ४० कंटेनरमधून यंत्रे पहाटे पोहोचली स्ट्राँगरूममध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 01:14 AM2019-05-01T01:14:45+5:302019-05-01T01:15:11+5:30

नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून, दोन्ही मतदारसंघांतील ईव्हीएम मशीन अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअरहाउसच्या स्ट्रॉँगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुरक्षितपणे मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरू होती.

 In the Strongroom, the device reached 40 containers with GPS system | जीपीएस यंत्रणा असलेल्या ४० कंटेनरमधून यंत्रे पहाटे पोहोचली स्ट्राँगरूममध्ये

जीपीएस यंत्रणा असलेल्या ४० कंटेनरमधून यंत्रे पहाटे पोहोचली स्ट्राँगरूममध्ये

Next

नाशिक : नाशिकदिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून, दोन्ही मतदारसंघांतील ईव्हीएम मशीन अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअरहाउसच्या स्ट्रॉँगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुरक्षितपणे मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरू होती.
मतदान संपल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन या त्यांच्या-त्यांच्या विधानसभानिहाय स्ट्राँगरूममध्ये आणण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येक विधानसभानिहाय तेथून गेलेल्या ईव्हीएम, परत आलेल्या ईव्हीएम याची मोजणी झाली.  सर्व व्यवस्थित असल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रत्येक बूथनिहाय ईव्हीएम मशीन ट्रक्स, कंटेनरमध्ये व्यवस्थित लावून सीलबंद करण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जातीने हजर
होते. त्यानंतर कंटेनर सीआरपीएफच्या सुरक्षाव्यवस्थेत अंबड येथील स्ट्राँगरूममध्ये पोहोचवण्यात आले. मंगळवारी पहाटे ३.३० वाजता पहिले कंटेनर पोहोचले. त्यानंतर एकेक करून सर्व कंटेनर आले.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीनची वाहतूक खुल्या वाहनातून न करता बंदिस्त असलेल्या कंटेनरमधून करावी. तसेच वाहनावर जीपीएस यंत्रणा बसवण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले होते.
सर्व विधानसभा मिळून जवळपास
४० कंटेनरचा उपयोग करण्यात आला. या सर्व कंटेनरवर जीपीएस यंत्रणा होती. तसेच सीआरपीएफच्या सुरक्षाव्यवस्थेत अंबड येथे पोहोचवण्यात आले.

Web Title:  In the Strongroom, the device reached 40 containers with GPS system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.