गिरणा मोसम पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 10:40 PM2019-09-07T22:40:22+5:302019-09-07T22:42:57+5:30

मालेगाव कॅम्प : शहरातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तर काही रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शहरातून ...

Structural audit of milling season bridges | गिरणा मोसम पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट

मालेगाव सामान्य रुग्णालयाजवळील मोसमनदीवर असलेला पूल धोकायदायक बनला असून, दुरुस्तीची मागणी होत आहे़

googlenewsNext
ठळक मुद्देमालेगाव । महापालिका प्रशासनाकडून नवीन पूल उभारण्याचा प्रस्ताव

मालेगाव कॅम्प : शहरातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तर काही रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शहरातून वाहणाऱ्या गिरणा, मोसम नद्यांना पूर आला होता. त्यामुळे शहरातील बहुतांश पूल पाण्याखाली गेले होते. परिणामी या पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संभाव्य दुर्घटना व सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून महापालिकेने पुलांचे (स्ट्रक्चलर आॅडिट) गुणवत्ता तपासणी सुरू केली आहे. मोसम नदीवरील प्रामुख्याने द्याने फरशी पूल व सांडवा पुलाची दुरुस्ती न करता हे दोन्ही पुलाच्या नवीन उंचीचे बांधकाम करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शहरात सर्वत्र लहान-मोठ्या मुख्य रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप होत आहे. जुजबी दुरुस्तींवर नागरिकांचा रोष आहे तर वेळोवेळी आंदोलन शहरात होत आहे. या सोबत तीन आठवड्यांपूर्वी शहरात नसला तरी धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणे समाधानकारक भरली. हरणबारी धरणातून मोसमनदीला पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे या नदीला पूर आला होता. तीन, चार दिवस पूर परिस्थिती सलग होती. तर गेले दोन दिवस या नदीवरील मालेगाव लगतचे वडगाव, द्याने पूल, रामसेतू, सांडवा पूल हे पूरपाण्याखाली गेले होते. पुलाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आमदार आसिफ शेख यांनी सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश केले. अद्याप त्याचा रिपोर्ट येणे बाकी आहे; परंतु द्याने, वडगाव, सामान्य रुग्णालय, अहिल्याबाई होळकर, दोन्ही मोसमपूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल, सांडवा, रामसेतू, घाटावरील नवीन पादचारी पूल, अल्लमा एकबाल पूल या सर्व ९-१० पुलांपैकी द्याने, सांडवा, रामसेतू पुलांचा प्रश्न गंभीर बनला आहे.
रामसेतू उंच असल्याने तो दुरुस्त होऊ शकतो; परंतु द्याने व सांडवा पूल दुरुस्त करण्यापेक्षा त्यावर नवीन उंच जादा लांबी-रुंदीचा पूल बनविल्यास सदर पुलांवरील वाहतुकीचा ताण कमी होऊ शकतो असा कयास येथील नगरसेवकांनी बांधला आहे. महापालिकेच्या नवीन दोन प्रस्तावित पुलांमुळे द्याने, सांडवापूल पूरपाण्यामुळे रहदारीस खुला राहू शकतो. तर बारा महिने या पुलांच्या वापरामुळे भाजी बाजार, रामसेतू धान्य बाजार आदी परिसरातील वाहतूक वळवली जाऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे यासाठी लवकरच अधिकृत प्रस्ताव टाकण्यासाठी महापालिका प्रशासन विचाराधिन आहे. शहराच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणाºया पुलांची कायमस्वरूपी देखभाल दुरुस्ती महापालिकेच्या बांधकाम व सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे गरजेचे आहे.शहरातील पूल बनले धोकादायकमालेगाव : शहरातील सांडवा पूल फार पूर्वीपासून वापरता पूल आहे. प्रत्येक पावसाळ्यात सांडवा बुडतो व नुकसान होते. संरक्षक कठडे नसल्याने असुरक्षितता आहे. हा पूल दुरुस्त करण्याऐवजी त्याची नव्याने उंची वाढवून जादा लांबी रुंदंीचा केल्यास कायमचा प्रश्न मिटणार आहे. महापालिका पदाधिकारी व प्रशासन शहरातील मोसम व गिरणा नदीवर नवीन पूल बांधण्याच्या विचाराधीन आहे. तसेच द्याने पूल दुरुस्त झाला आहे; परंतु त्याची उंची कमी आहे. अगदी थोडे पाणी वाढल्यास पुलावर पाणी साचते तर पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होते. हा पूल मोठ्या उंचीने नवीन बांधकाम केल्यास समस्या कमी होतील व नागरिकांना कुसुंबारोडने मोठा फेरा करावा लागणार नाही, यावर महानगरपालिकेने विचार करावा अशी मागणी द्याने, वडगाव व मोसम काठावरील गावातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Structural audit of milling season bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार