विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विभागाची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 10:06 PM2020-07-23T22:06:54+5:302020-07-24T00:27:06+5:30
नाशिक : कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून शाळेपासून नाळ तुटलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाने विविध माध्यमातून प्रयत्न चालविले असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पर्यायांचा वापर करून शिक्षक पोहोचले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणे सोपे झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या सुमारे तीन हजार प्राथमिक शाळा असून, अडीच लाखांच्या आसपास विद्यार्थी आहेत. मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने यंदा वार्षिक परीक्षाही होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभाग व शिक्षकांनी एकत्रितपणे प्रयत्नांना सुरुवात केली आहे. विद्यार्थी-पालकांकडे स्मार्टफोनचा असलेला अभाव पाहता अन्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षक गावागावांत जाऊन विद्यादानाचे काम करीत आहेत.
६० टक्के विद्यार्थी भ्रमणध्वनीविना; आॅनलाइन शिक्षणातील अडचणी संपेना
शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय ठेवला असला तरी, साधन सामुग्री अभावी अजूनही अडचणी येत आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या ४० टक्के पालकांकडे स्मार्टफोन आहेत, ६० टक्के विद्यार्थी त्यापासून वंचित आहेत.
गावोगावच्या शिक्षकांकडून व विद्यार्थी, पालकांकडून मागविलेल्या माहितीनुसार पुरेशी साधने नसल्याने अन्य पर्यायांचा आधार घेतला जात आहे.
--------------
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्याच्या माध्यमातून शिक्षकांचा विद्यार्थी व पालकांशी संपर्क प्रस्थापित झाला असून, जे शिक्षक गावातच राहतात त्यांच्या करवी गावातील विद्यार्थ्यांसाठी शिकविण्यास सुरुवात झाली आहे.
काही गावांमध्ये गावकऱ्यांनी एकत्र येत शाळांना दूरचित्रवाणी संच भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली असून, आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाºया सुरगाण्यात हा पहिलाच प्रयोग करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांनी दिली.