अस्तित्वाची झुंज : नाशकात प्रौढ बिबट्याने काढला लहान बिबट्याचा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 03:53 PM2020-05-17T15:53:49+5:302020-05-17T15:56:05+5:30

साधारणत: आठवडाभरापुर्वी या दोन्ही बिबट्यांमध्ये लढाई झाली असावी, असा अंदाज वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी वर्तविला आहे.

Struggle for Existence: A small leopard's thorn was removed by an adult leopard in Nashik | अस्तित्वाची झुंज : नाशकात प्रौढ बिबट्याने काढला लहान बिबट्याचा काटा

अस्तित्वाची झुंज : नाशकात प्रौढ बिबट्याने काढला लहान बिबट्याचा काटा

Next
ठळक मुद्देपावासानेमुळे बिबट्याचा मृतदेह कुजलाआठवडाभरापुर्वी या दोन्ही बिबट्यांमध्ये लढाई

नाशिक : आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वन्यप्राण्यांमधील दोन्ही नर आपआपसांत निकराची झुंज देतात. या झुंजीत अनेकदा वन्यप्राण्यांचा मृत्यूही होतो, असाच प्रकार नाशिकमधील पश्चिम वनविभागाच्या हद्दीतील तळेगाव येथील राखीव वनात काही दिवसांपुर्वी घडल्याचे कुजलेल्या अवस्थेत रविवारी (दि.१७) आढळून आलेल्या बिबट्याच्या मृतदेहावरून समोर आले.

नाशिक तालुक्यातील महिरावणीजवळ असलेल्या तळेगाव शिवारातील राखीव वनासह येथील डोंगराच्या पायथ्याला बिबट, तरस यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर आढळतो. दरम्यान, आपले क्षेत्र सुरक्षित राखण्यासाठी एक प्रौढ बिबट्या आणि नुकताच वयात आलेला बिबट्यामध्ये संघर्ष उफाळून आला. साधारणत: आठवडाभरापुर्वी या दोन्ही बिबट्यांमध्ये लढाई झाली असावी, असा अंदाज वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी वर्तविला आहे.
दोन दिवसांपुर्वी शहरासह ग्रामिण भागात मोसमीपुर्व पावासाने जोरदार हजेरी लावल्यामुळे बिबट्याचा मृतदेह कुजला आणि वनक्षेत्रातून तळेगावातील लोकवस्तीपर्यंत हवेच्या सहाय्याने दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने गावकऱ्यांनी वनाच्या दिशेने दुर्गंधीच्या अधारे माग काढला; मात्र त्यांना काहीही आढळून आले नाही. गावकऱ्यांनी ही बाब वनधिकारी व कर्मचा-यांना कळविली. काही वेळेतच सातपूर परिमंडळचे वनपाल, वनरक्षकांना घेऊन भदाणे हे राखीव वनात पोहचले. दुर्गंधीच्या अधारे जंगलात शोध घेत असताना मातीआड झालेले बिबट्याची कातडी व डोके काहीसे दिसून आले. त्यामुळे वनरक्षकांनी तत्काळ फावड्याच्या सहाय्याने माती बाजूला केली असता बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. यावेळी कातडी पुर्णपणे मातीत गळून गेलेली होती तर हाडांचा सांगाडा आणि डोके यावरून त्याची ओळख वनकर्मचा-यांनी पटविली. दीड ते दोन वर्षांचा बिबट असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बिबट्याचा मृत्यू हा अस्तित्वाच्या लढाईत झाला असल्याचा दावा नाशिक पश्चिम वनविभागाने केला आहे.
 

Web Title: Struggle for Existence: A small leopard's thorn was removed by an adult leopard in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.