कामासाठी धडपड! रोज काम अन् भाकरी मिळेलच याचा भरोसा नाही; मजुरांना करावा लागतोय संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 02:46 PM2022-02-10T14:46:45+5:302022-02-10T14:52:20+5:30

रोजंदारीने काम करणारांबरोबरच अंगावर काम घेऊन काम करणारे अशा दोन्ही प्रकारचे मजूर या नाक्यांवर पाहायला मिळतात. यातील प्रत्येकाच्या समस्या ...

Struggle for work! There is no guarantee that you will get bread and bread every day | कामासाठी धडपड! रोज काम अन् भाकरी मिळेलच याचा भरोसा नाही; मजुरांना करावा लागतोय संघर्ष

कामासाठी धडपड! रोज काम अन् भाकरी मिळेलच याचा भरोसा नाही; मजुरांना करावा लागतोय संघर्ष

Next

रोजंदारीने काम करणारांबरोबरच अंगावर काम घेऊन काम करणारे अशा दोन्ही प्रकारचे मजूर या नाक्यांवर पाहायला मिळतात. यातील प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असल्या तरी सलग काम मिळणे हा सर्वांसमोरचा मोठा प्रश्न आहे. ठेकेदाराकडे काम करणाऱ्यांना असा सलग रोजगार मिळत असला तरी रोजंदारीने काम करणाऱ्यांना मात्र दररोजच दुसरा मालक शोधावा लागतो. यामुळे कधी काम मिळते तर कधी मिळत नाही. अनेकवेळा येथील मजुरांच्या विश्वासार्हतेबाबतही शासंकता व्यक्त केली जात असल्याने मालकांना तसा विश्वास देण्याची अनेकांना कसरत करावी लागते.

काम मिळाले तरच किराणा

मजूर नाक्यांवर काम करणारांमध्ये बहुतेक बिगारी, मदतनीस म्हणून काम करणारे किंवा विटा, खडी, सिमेंट उचलणाऱ्या मजुरांची संख्या अधिक असते. या मजुरांचे पोट हातावरच अवलंबून असते. सकाळी काम मिळाले तर सायंकाळी चूल पेटणार अशीही काहींची स्थिती असते. यामुळे प्रत्येक जण सकाळीच काम मिळविण्यासाठी धडपड करीत असतो. प्रसंगी दोन रुपये कमी मिळाले तरी चालतील अशा तडजोडीतून अनेक मजूर काम मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात.

आठवड्यातून दोनच दिवस काम

अकुशल कामगारांना दररोज काम मिळतेच असे नाही. काही बिगारी आणि अकुशल कामगारांना तर अठवड्यातून दोन-तीन दिवसच काम मिळते तर इतर दिवशी त्यांना घरी बसावे लागते. ज्यांना रोज पगार घेण्याची सवय लागलेली असते अशा मजुरांची यात संख्या अधिक असते.

मी ३० वर्षांपासून बिगारी काम करतो. कधी काम मिळते कधी मिळत नाही. मागील दोन वर्षांपासून तर खूपच अडचणींचा सामना करावा लागत आहे. काम मिळत नसल्याने शिवभोजन थाळीवरच दिवस काढावा लागतो. गेल्या दोन दिवसांपासून मला काम मिळालेले नाही.

- चेतन बर्वे, नाशिकरोड

मी रोज सकाळी नाक्यावर येतो. कधी बिगारी काम मिळते कधी मिळत नाही. काम मिळाले नाही तर परत घरी जावे लागते. राहायला स्वत:चे घर नाही. भाडे तत्त्वावर घेतलेल्या खोलीत राहातो. काम मिळत नसल्याने कधी कधी खोली भाडे देण्यासही अडचणी येतात.

- भारत सोनवणे, मजूर, नाशिकरोड

मी स्लॅब भरण्याचे काम करतो. गेल्या आठ दिवसांपासून काम मिळालेले नाही. खूप झाले तर महिन्यात दहा ते १५ दिवस काम मिळते. इतर दिवस घरीच रहावे लागते. अनेकवेळा शिवभोजन थाळी खाऊन दिवस काढावा लागतो. आजारी पडले तर दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नसतात.

- अजय गायकवाड, मजूर, नाशिकरोड

Web Title: Struggle for work! There is no guarantee that you will get bread and bread every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक